Diwali 2021 | दिवाळीत ग्रहांचा शुभयोग ! 4 राशीच्या जातकांना होईल ‘लाभ’, लक्ष्मीमातेची राहील विशेष कृपा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Diwali 2021 | या दिवाळीत ग्रहांचा दुर्मिळ योग होत आहे. 4 नोव्हेंबरला 4 ग्रह एकाच राशीत विराजमान आहेत. सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्रग्रह चौघेही एकाचवेळी तुळ राशीत विराजमान (Diwali 2021) आहेत. हे चार ग्रह सोबत असल्याने अनेक राशीच्या लोकांना लाभ होईल. परंतु प्रामुख्याने ही स्थिती 4 राशीवाल्यांसाठी विशेष असणार आहे. माता लक्ष्मीची या राशीच्या लोकांवर विशेष कृपा राहील.

 

1. वृषभ :

 

या राशीच्या जातकांना धनलाभाची प्रबळ शक्यता आहे. नोकरी आणि व्यापारात प्रगती होईल. लक्ष्मी मातेची कृपा राहील.
ज्यामुळे आर्थिकस्थिती पहिल्यापेक्षा चांगली होईल. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकता. धार्मिक कामात मन लागेल. जुन्या कर्ज फेडू शकता.

 

2. कर्क :

 

या राशीला ही ग्रहस्थिती खुप शुभ ठरणार आहे. लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहणार आहे. धन-संपत्तीत वाढ होईल.
नोकरीत प्रमोशन मिळू शकते. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. प्रवासातून लाभ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

 

3. तुळ :

 

या राशीवाल्यांसाठी ग्रहाची स्थिती खुप शुभ आहे. लक्ष्मीमातेची विशेष कृपा राहील. ज्यामुळे आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता आहे.
जे जातक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करेल. इन्कम वाढू शकते.

 

4 धनु :

 

या राशीच्या जातकांवर दिवाळीत लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहील. बिघडलेली कामे होतील. आर्थिकस्थिती सुधारेल.
घर किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. नवीन आणि चांगली नोकरी मिळेल. कुटुंबाचे वातावरण आनंदी राहील. (Diwali 2021)

 

Web Title : Diwali 2021 | auspicious yoga of planets made on diwali 2021 4 zodiac signs will get its benefit maa lakshmi will have special grace

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात करून किती मिळाला दिलासा? वाढीच्या तुलनेत किरकोळ आहे घसरण, जाणून घ्या पूर्ण गणित

Anil Deshmukh | 100 कोटी वसुली प्रकरण : वसुलीची रक्कम हवालामार्फत देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या विविध 27 कंपन्या वळवल्याचा ED ला संशय

PM Modi | ना सुरक्षेची उपाययोजना, ना ट्रॅफिक थांबवली; दिल्लीच्या रस्त्यावर सामान्य माणसाप्रमाणे निघाले PM मोदी (व्हिडिओ)