Diwali 2021 | दिवाळीच्या रात्री आवश्य खा ‘ही’ एक गोष्ट; ‘प्रगती’-‘आनंदा’ला लागणार नाही कुणाची ‘नजर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Diwali 2021 | सणाचा हंगाम सुरु झाला आहे. हा पूर्ण आठवडा सणांनी भरलेला आहे. धनत्रयोदशीनंतर 3 नोव्हेंबरला छोटी दिवाळी, 4 नोव्हेंबरला मोठी दिवाळी, 5 नोव्हेंबरला गोवर्धन पूजा आणि 6 नोव्हेंबरला भाऊबीजेचा सण (Diwali 2021) साजरा केला जाईल. या सर्व सणांना काही गोष्टी खाणे खुप शुभ मानले जाते. त्या (auspicious foods) खाल्ल्याने गुडलक येते, असे म्हटले जाते.

 

– धनत्रयोदशीला काय खावे?
धनत्रयोदशीला उत्तर भारतात छोट्या मुलींना दही पुरी खाऊ घालावी. ही पुरी पाणीपुरीची असते. पाण्याऐवजी दही घालावे. तसेच धनत्रयोदशीला नैवेद्य, लाप्सी, गुळाची खीर आणि पंचामृत अर्पण करणे आणि खाणे सुद्धा शुभ मानले जाते.

 

– छोट्या दिवाळीला काय खावे?
हिंदू धर्मानुसार कार्तिक मासाच्या कृष्ण चतुर्दशीला पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला होता. हनुमानाला बुंदीच्या लाडूचा प्रसाद अर्पण करावा आणि सेवन करावा.

 

– दिवाळीला काय खावे?
दिवाळीला लक्ष्मीमातेला मखान्याची खीर अर्पण करणे खुप शुभ आहे. तसेच दिवाळीच्या रात्री सूरणाची भाजी खावी. यामुळे प्रगती आणि संपन्नता येते.

 

– गोवर्धन पूजेला काय खावे?
गोवर्धन पूजेला मालपुवा खावा. हे अतिशय शुभ मानले जाते.

 

– भाऊबीजेला काय खावे?
भाऊबीजेला भात खाणे खुप शुभ आहे. यापाठीमागे यमराज आणि यमुनाची एक पौराणिक कथा आहे. कुंकु आणि तांदळाचा तिलक केल्याने भावाचा भाग्योदय होतो. (Diwali 2021)

 

Web Title :- Diwali 2021 | diwali 2021 auspicious foods to in festival season from dhanteras to bhai dooj

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

COVAXIN च्या आपत्कालीन वापराला अखेर WHO ने दिली मंजूरी, मोठ्या कालावधीपासून प्रलंबित होते प्रकरण

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,519 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Modi Government | मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना दिवाळी भेट ! इंधनावरील टॅक्स घटवला, पेट्रोल 5 रूपयांनी तर डिझेल 10 रूपयांनी ‘स्वस्त’

Pune Crime | पोलिस कर्मचार्‍याकडून शारीरिक व मानसिक त्रास ! WhatsApp व्दारे सुसाईट नोट पाठवून महिला पोलिसाची आत्महत्या, प्रचंड खळबळ