खुशखबर ! 50 लाख सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळी ‘गिफ्ट’, महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ, DA 12% नव्हे तर 17% मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदा केंद्र सरकारने सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीची भेट दिली आहे. मंत्रिमंडळाने कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये पाच टक्के वाढीस मान्यता दिली असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, ‘सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली जाईल. मंत्रिमंडळाने डीएमध्ये पाच टक्के वाढीस मान्यता दिली आहे. त्यामुळे ५० लाख सरकारी कर्मचारी आणि ६२ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे सरकारवर सुमारे १६००० कोटी रुपयांचा भार वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. आत्ता डीए १२ टक्क्यांवरून १७ टक्के झाला आहे.

जावडेकरांनी सांगितले कि, पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत आधार कार्ड सक्तीने जोडण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. आता लाभार्थी शेतकऱ्यांकडे त्यांचे खाते आधारशी जोडण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत वेळ असेल.

Visit : Policenama.com