ऐन दिवाळीत थंडी गायब, मुंबईचा पारा 36 अंशावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील अंगाला झोंबणारी बोचरी थंडी गायब झाली असून तापमानात वाढ नोंदविण्यात (diwali-cold-disappears-mumbais-mercury-36-degrees) येत आहे. मुंबईचे कमाल तापमान 36 अंश तर किमान तापमान 25 अंशांवर दाखल झाले आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मुंबईचे कमाल तापमान 36 अंशांवर आहे. गेल्या 48 तासांपासून हवामानात हे बदल नोंदविण्यात आले आहेत. शिवाय पुढील 48 तासांत तापमान 36 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल. कोकण विभागातही तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. हे तापमान 32 अंशांच्या आसपास असेल. मुंबईच्या किमान तापमानात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांगली घसरण झाली होती. ते 19 अंशांच्या आसपास गेले हाेते. त्यामुळे गेला आठवडाभर मुंबईत थंडी होती. दिवाळीदरम्यान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार, तापमानात वाढ नोंदविण्यात आली.

मुंबईचे किमान तापमान
13 नोव्हेंबर : 23 अंश सेल्सिअस
14 नोव्हेंबर : 24 अंश सेल्सिअस
15 नोव्हेंबर :25 अंश सेल्सिअस