समता कृती प्रतिष्ठानच्यावतीने ममता बाल सदन अनाथाश्रमातील मुलांना दिवाळी फराळ वाटप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – समाजात श्रीमंत-गरीब मोठी दरी आहे. संपत्तीच्या केंद्रीकरणामुळे समाजातील गरीब घटकांच्या मूलभूत गरजा भागविताना त्रेधातिरपिट उडते. मदतीचा हात म्हणून गरीब व वंचितांना दानशूरांनी मदत करावी, असे आवाहन राष्ट्रपती पारितोषिकविजेते प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले.

पुणे जिल्हा समता कृती प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या २४ वर्षापासून गरिबांची दिवाळी असा उपक्रम राबवला जातो. गरिबांची दिवाळी या उपक्रमांमध्ये जेजुरी पोलीस ठाण्यापासून दिवाळीचा फराळ गोळा करण्यास सुरुवात होते व संपूर्ण जेजुरी शहर बेलसर वाघापूर पारगाव या परिसरांमधून दिवाळीचा फराळ एकत्र गोळा करून तो कुंभारवळण (ता. पुरंदर) येथील ममता बाल सदन या अनाथाश्रमातील मुलांना वाटप केला जातो, असा हा उपक्रम गेली पंचवीस वर्षे सातत्याने सुरु आहे.

समता कृती प्रतिष्ठानच्यावतीने ममता बाल सदन आश्रमात दरवर्षी या उपक्रमानंतर सामाजिक शैक्षणिक कृषी या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी
अंकुश माने, अतुल सलाखे, हौसाबाई कुदळे, विजय दिंडे, शामराव कांबळे, संजय दुर्गुडे, विकास भोसले, रोहिणी कामठे, लीना ओरपे, संदीप कुंभार, विद्या म्हेत्रे या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी समता कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर कदम, राहुल कदम, रवींद्र लोंढे, पंढरीनाथ लोंढे, सचिन कदम, महेश पेशवे, दादासाहेब फडतरे, सुनील लोणकर, संदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

Visit : Policenama.com