खादी आयोग ऑनलाइन विकतेय मातीचे दिवे, महिन्यात 10000 दिव्यांची विक्री

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : खादी व ग्रामोद्योग आयोगाने दिवाळीच्या सणापूर्वी एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत सुमारे 10 हजार दिवे विकले आहेत. आयोगाने म्हंटले की, त्यांच्याकडून यावर्षी पहिल्यांदाच दिव्यांची विक्री केली आहे. 8 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ऑनलाइन विक्रीनंतर, महिन्यापेक्षा कमी कालावधीत 10,000 दिव्यांची ऑनलाइन विक्री झाली आहे. आयोगाने आठ प्रकारचे दिवे सादर केले आहेत. बारा दिव्यांच्या एका सेटची किंमत 84 ते 108 रुपये दरम्यान आहे. दिव्यांवर आयोग दहा टक्के सूट देत आहे.

खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या विशेष उपक्रमामुळे कुंभाराच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. केव्हीआयसीने दिवाळीत मातीच्या दिव्यांची ऑनलाईन विक्री सुरू केली आहे. राजस्थानमधील जैसलमेर व हनुमानगड जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये खादी इंडियाच्या ई पोर्टलमुळे या कुंभारांनी बनविलेले मातीचे दिवे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ वोकल फॉर लोकल’ अभियानाला अर्थपूर्ण बनविण्यासाठी ऑनलाईन व स्टोअरच्या माध्यमातून विकण्याचा निर्णय घेण्यात आला. केआयसीसीशी संबंधित कुंभारांनी प्रत्येक दिव्याच्या विक्रीवर 2 ते 3 रुपयांची कमाई केल्याचा आनंद व्यक्त केला आहे. खादी डिझायनर दिवे खादीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

दिल्ली आणि इतर शहरांमध्ये केआयसीआय लक्ष्मी-गणेश मूर्ती आणि इतर सजावटीच्या वस्तूंसारख्या मातीच्या वस्तू, दिवे व इतर वस्तू विकत आहेत. या मूर्ती वाराणसी, राजस्थान, हरियाणा आणि इतर राज्यातील कुंभारांकडून बनविल्या जात आहेत आणि कुंभारांच्या चांगल्या उत्पन्नाचे स्रोत होत आहेत.