Diwali Shopping | गेल्या 10 वर्षातील सर्व रेकॉर्डब्रेक ! दिवाळीला 1.25 लाख कोटीच्या वस्तूंची विक्री; चीनचे 50 हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Diwali Shopping | बाजारात यावर्षी दिवाळीची जबरदस्त शॉपिंग (Diwali Shopping) झाली. व्यापारी संघटनांची संस्था कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजे कॅट (CAIT) नुसार यावर्षीच्या व्यापाराच्या आकड्याने दिवाळीला मागील 10 वर्षाच्या विक्रीचा विक्रम मोडला आहे आणि सणाचा व्यापार 1.25 लाख कोटी रुपयाच्या स्तरावर पोहचला आहे. ट्रेडर्स बॉडी कॅटने दावा करत म्हटले की, दिवाळी विक्रीने मागील दोन वर्षापासून जारी आर्थिक मंदी नष्ट केली आहे. दिवाळी व्यापारात जोरदार विक्रीमुळे उत्साही होऊन आता व्यापारी 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या लग्नसराईसाठी तयारी करत आहेत.

Diwali Shopping | diwali shopping at 1 25 lakh crore festive sale breaks 10 year record says cait know details

 

दिल्लीत 25 हजार कोटी रुपयांचा व्यापार

 

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीय आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले की,
यावर्षीच्या दिवाळी सणात संपूर्ण देशात जवळपास 1.25 लाख कोटी रुपयांचा अंदाजे व्यापार झाला आहे.
जो मागील एक दशकात आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे.
दुसरीकडे एकट्या दिल्लीत हा व्यापार सुमारे 25,000 कोटी रुपये झाला.

Diwali Shopping | diwali shopping at 1 25 lakh crore festive sale breaks 10 year record says cait know details

 

चीनचे 50 हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान

 

त्यांनी पुढे म्हटले की, यावेळी कोणत्याही चीनी वस्तू विकल्या गेल्या नाहीत. ग्राहकांनी सुद्धा भारतात तयार केलेल्या वस्तूंवर जोर दिला.
खरेदीचा असा कल राहिल्याने चीनला 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. (Diwali Shopping)

Diwali Shopping | diwali shopping at 1 25 lakh crore festive sale breaks 10 year record says cait know details

 

9,000 कोटी रुपयांची दागिने आणि भांड्यांची विक्री

 

कॅटनुसार, पारंपरिक दिवाळी आयटम जसे की, मातीचे दिवे, पेपर लॅम्प, मेणबत्ती इत्यादीला सर्वाधिक मागणी असल्याने भारतीय कारागिरांचा चांगला व्यापार झाला.
याशिवाय गृहसजावटीचे सामान, मिठाई, सुकामेवा, कपडे, पादत्राणे, घड्याळे आणि खेळणीसारख्या वस्तूंची मागणी खुप वाढली होती.
सोन्या-चांदीचे दागिने किंवा भांड्यांची या दिवाळीत 9 हजार कोटी रुपयांची विक्री झाली. तर, यावर्षी 15 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजिंग वस्तूंची विक्री झाली.

 

Web Title : Diwali Shopping | diwali shopping at 1 25 lakh crore festive sale breaks 10 year record says cait know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 661 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Hrishikesh Deshmukh | अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेश यांच्या अडचणीत वाढ? अटकपूर्व जामीन लांबला (व्हिडीओ)

Fastag | अ‍ॅक्सीडेंट झाल्यानंतर गाडीवरील फास्टॅग काढून टाका, जाणून घ्या काय आहे कारण?