Diwali Shopping Trends | व्हॉईस कमांड आणि मूडनुसार बदलेल तुमच्या घरातील प्रकाश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Diwali Shopping Trends | दीपावली (Diwali) म्हणजे दीपोत्सव. प्रकाशाचा उत्सव (Lighting Festival). यासाठी आपण सर्व आपल्या घरात एकापेक्षा एक लाईट डेकोरेशन (Light Decoration) करत असतो. हे लक्षात घेऊनच बाजारात आता नवीन लाईट फिटिंग्जचे कलेक्शन (Diwali Shopping Trends) आले आहे.

 

पिक्सल एलईडी लाईट्स ट्रेंड
सीरीज लायटिंग (Series Lighting) असो की झूंबर. वॉल लॅम्प (wall lamp) असो की हँगिंग लाईट्स (hanging lights). सर्वात यावेळी नवीन ट्रेंड दिसून येत आहे. घरात दिवाळीचा झगमगाट असावा, पण वीजसुद्धा जास्त खर्च होऊ नये, यासाठी यावेळी पिक्सल एलईडी लाईट्स ट्रेंड (Pixel LED Lights Trend) दिसत आहे. झुंबरपासून सीरीजपर्यंत सर्व वस्तू स्टार रेटिंगसह मिळत आहेत, जेणेकरून तुम्हाला चांगले लाईट्स निवडता येतील.

 

रंगीत प्रकाशात घ्या संगीताचा आनंद
इंटेरियर डिझायनर विरेंद्र पूर्विया यांनी सांगितले की, यावेळी मल्टीकलर एलईडी लाईट्स (Multicolor LED Lights) सुद्धा पसंत केल्या जात आहेत. या लाईटमध्ये इनबिल्ट स्पीकर आहे आणि रिमोटद्वारे साऊंड सिस्टम आणि लाईट्स कंट्रोल करता येऊ शकते. ई कॉमर्स साईटवर 250 ते 300 रुपयांपर्यंत एक बल्ब मिळत आहे.

मूड आणि गरजेनुसार व्हॉईस कमांडवर बदला लाईट
लायटिंग कन्सल्टंट साहू यांनी सांगितले की, व्हॉईस कंट्रोलचे शॅडेलियर्स सध्या पसंत केले जात आहेत.
यामध्ये मूड आणि गरजेच्या हिशेबाने व्हॉईस कमांडवर लाईट बदलू शकता.

 

फिरोजाबादी ट्रेडिशनल लॅम्प पुन्हा ट्रेंडमध्ये
तर, फिरोजाबादी ट्रेडिशनल लॅम्प पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आहेत.
अगोदर यांची मागणी चायनीज लाईटमुळे कमी झाली होती.
परंतु आता मेड इन इंडिया आयटम्सवर जास्त जोर आहे.
याच कारणामुळे लाईट्स, झूंबर आणि सीरीज सर्व मागील वर्षाच्या तुलनेत 15 ते 20 % महाग आहेत.
(Diwali Shopping Trends)

 

Web Title :- Diwali Shopping Trends | diwali shopping trends the lighting of your house will change according to voice commands and mood

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Atal Pension Yojana | अटल पेन्शन योजनेत खाते उघडण्यासाठी आधार E-KYC ने होईल काम, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Anti Corruption Bureau kolhapur | 5 हजाराची लाच घेताना बांधकाम विभागातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात