स्वयंपाक घरातील ‘या’ 5 गोष्टींनी फेसपॅक बनवा, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – प्रत्येक स्त्रीची आपली त्वचा तरुण आणि गोरी दिसण्याची इच्छा असते. स्त्रिया त्वचा चमकदार आणि टवटवीत राहण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात. आपण बर्‍याच प्रकारची उत्पादने वापरतो. त्वचेवर कोणतेही उत्पादन लावण्यापूर्वी आपल्या त्वचेच्या प्रकारची काळजी घ्या. तेलकट आणि कोरडी त्वचा सहज समजून येते, परंतु कॉम्बिनेशन त्वचा समजून येत नाही.

कॉम्बिनेशन त्वचा
आपल्याला तेलकट आणि कोरडी त्वचा सहज लक्षात येते. पण आपला टी-झोन बर्‍याचदा तेलकट असेल आणि उर्वरित त्वचा कोरडी असेल तर याचा अर्थ आपली त्वचा कॉम्बिनेशन प्रकारची आहे. काही फेस पॅक बघू या. यामुळे चेहरा तेलकट आणि कोरडाही राहणार नाही.

१)मध आणि लिंबू
यासाठी मध आणि लिंबाचे मिश्रण तयार करा. हा फेस पॅक लावण्यापूर्वी आपला चेहरा चांगला स्वच्छ करा. आता हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा. लिंबू आणि मध यांनी बनविलेले फेस पॅक आठवड्यातून दोनदा वापरला जाऊ शकतो. मध एक मॉइश्चरायझर म्हणून काम करतो तर लिंबू त्वचेतून अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते.

२)संत्र्याची साल आणि दही
हा फेस पॅक बनवण्यासाठी संत्रीची साल सुकवून घ्या. आणि बारीक करा. यानंतर एक चमचे दही घाला आणि मिश्रण करावे. हे फेस पॅक ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनंतर धुवून टाकावे. हे आपल्या चेहऱ्यावरील घाण काढून टाकण्यास मदत करेल आणि त्वचा चमकदार बनवेल.

३)अंडी आणि ऑलिव्ह ऑइल
यासाठी एक अंडी घ्या. त्यातील पांढरा भाग घेऊन त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑइल टाकून एकजीव करून मिश्रण तयार करा.हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझर लावा.आठवड्यातून एकदा हे लावू शकतो.यामुळे त्वचा निरोगी राहील.

४)गुलाबपाणी, मध आणि दही
हे फेस पॅक करण्यासाठी, १ चमचा गुलाब पाणी, मध आणि दही घ्या आणि चांगले मिश्रण तयार करा. नंतर ते चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

५)स्ट्रॉबेरी आणि दही
हा पॅक तयार करण्यासाठी, तीन ते चार स्ट्रॉबेरीमध्ये अर्धा कप दही घाला आणि चांगले मिश्रण तयार करून घ्या. ते आपल्या चेहऱ्यावर लावून नंतर २० मिनिटांनी पाण्याने धुवा. हा पॅक मुरुमांना काढून टाकते आणि टॅनिंगपासून देखील मुक्त करते.

You might also like