केस आणि टाळूवर रात्रभर लावून ठेवू शकता ‘हे’ 2 हेअर मास्क, मजबूत आणि लांब केसांसह मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – आज आपण असे 2 हेअर मास्क तयार करण्याची पद्धत जाणून घेणार आहोत ज्यामुळं तुमच्या केसांना भरपूर फायदे मिळतील. यामुळं तुम्हाला लांबसडक आणि मजबूत केस मिळतील. याशिवाय इतरही अनेक लाभ मिळतील.

1) जास्वंदाच्या फुलाचा हेअर मास्क

यासाठी तुम्हाला पुढील सामग्रीची आवश्यकता आहे
– 2 किंवा 3 जास्वांदाची फुलं
– 50 एमएल नारळाचं दूध
– 2-3 चमचे मोहरीचं तेल
– मोहरीचं तेल नसेल तर ऑलिव्ह ऑईल

‘असा’ तयार करा हेअर मास्क
– एका वाटीत जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या घ्या.
– यात नारळाचं दूध आणि तेल घाला
– आता याची पेस्ट तयार करा.
– आता ही पेस्ट आपल्या टाळूवर लावा.
– हा मास्क 15 मिनिटे केसांमध्ये राहू द्या.
– हा मास्क पूर्ण केसांना लावण्याची गरज नाही कारण तो केसांच्या वाढीसाठी आहे.

2) मोहरीचा हेअर मास्क

यासाठी तुम्हाला पुढील सामग्रीची आवश्यकता आहे
– 2-3 चमचे मोहरीचं तेल
– गरजेनुसार ॲलोव्हेरा जेल
– नारळ तेल
– 3-4 व्हिटॅमिन ई कॅप्सुल

‘असा’ तयार करा हेअर मास्क
– वरील सर्व सामग्री मिक्सरमधून बारीक वाटून घ्या
– बारीक पेस्ट तयार करा.
– ही पेस्ट तुम्ही रात्रभर देखील आपल्या टाळूवर लावून ठेवू शकता.
– जर पेस्ट लावल्यानंतर टाळूच्या त्वचेवर तुम्हाला जळजळ झाल्यासारखं वाटलं तर काळजी करू नका.
– जर या जळजळीचं प्रमाण जास्त असेल तर केस थंड पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या.

हेअर मास्क किती वेळा लावावा ?
तुम्ही एकदिवसाआड या हेअरमास्कचा वापर करू शकता. म्हणजेच आठवड्यातून 3 वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. सलग 8 ते 9 आठवडे जर हा उपाय केला तर केसांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. जर योग्य प्रकारे याचा वापर केला तर पहिल्याच आठवड्यात तुम्हाला चांगला फरक दिसून येईल. परंतु यासाठी डॉक्टरांचा सल्लाही नक्की घ्या.

काय आहेत याचे फायदे ?
– लांबसडक आणि घनदाट केस
– निर्जीव आणि निस्तेज केसांची समस्या दूर होते.
– केसांचं आरोग्य चांगलं राहतं.
– केस मजबूत होतात
– मुळांसह पूर्ण केसांना पोषक घटकांचा पुरवठा होतो.
– केसांना नैसर्गित चमक येते.
– यातील व्हिटॅमिन सीमुळं हेअर फॉलिकल्स मजबूत होतात ज्यामुळं कोंड्याची समस्या कमी होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like