जाणून घ्या, तिळाच्या तेलाने ओठांचा काळेपणा कसा दूर करावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ओठांचा कोरडेपणा आणि टॅनिंगपासून ओठांना वाचवणे आवश्यक आहे कारण जर यापासून काळजी घेतली नाही तर ओठांना काळेपणा येतो. बाजारात ओठांचा काळेपणा घालविण्यासाठी भरपूर उत्पादने मिळतात. तरीहि ओठांचा काळेपणा दूर होत नाही. तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात तिळाच्या तेलाचा समावेश करून घेतलात तर त्याचा फायदा होतो. तिळाच्या तेलामुळे ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी फायदा होतो.

लागणारे साहित्य :

अर्धा चमचा तिळाचे तेल आणि चिमूटभर हळद अशी आहे वापरण्याची पद्धत एका बाऊलमध्ये तिळाचे तेल घ्यावे आणि त्यात चिमूटभर हळद मिक्स करावे. हा घरगुती लिप मास्क तुम्ही ओठांवर लावावा. साधारण अर्धा तास तसेच राहू द्या आणि मग ओठ थंड पाण्याने स्वच्छ धुवावे. हळदीत ब्लिचिंग घटक असते ज्यामुळे तुमच्या ओठांना उजळपणा मिळतो. ओठ जर टॅनिंगमुळे काळे झाले असतील तर तुम्ही हा लिप मास्क रोज लावावा.

तीळ व नारळाच्या तेलाचा लिप बाम

लागणारे साहित्य :

एक लहान चमचा तिळाचे तेल आणि अर्धा चमचा नारळाचे तेल

अशी आहे वापरण्याची पद्धत :

एका बाऊलमध्ये दोन्ही तेल नीट मिक्स करून घ्यावे. आता हे मिश्रण तुम्ही दिवसातून दोन वेळा ओठांना लावावे. हलक्या हाताने ओठांचा मसाज करावी. यामुळे ओठांचा काळेपणा आठवड्यात दूर होईल. तुम्ही केवळ तिळाच्या तेलाचाही वापर करून घेऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर हे मिश्रण ओठांना लाऊन झोपलात तर तुमचे ओठ मूळ गुलाबी रंगाचे होतील.

साखर व तिळाच्या तेलाचा लिप स्क्रब

लागणारे साहित्य :

एक लहान चमचा साखर आणि अर्धा चमचा तिळाचे तेल

अशी आहे वापरण्याची पद्धत :

बाऊलमध्ये साखर घ्या. साखरेचे दाणे जर मोठे असतील तर तुम्ही हलकेसे क्रश करून घ्यावी
आता यात तिळाचं तेल मिक्स करून लिप स्क्रब तयार करावा. त्यानंतर हा स्क्रब ओठांना लावावा. साधारण एक मिनिटपर्यंत ओठ स्क्रब करावे. मग, पाण्याने ओठ साफ करून घ्यावे. तुम्ही हा स्क्रबआठवड्यातून तीन वेळा तरी किमान याचा वापरावा.

जाणून घ्या त्वचेसाठी तिळाच्या तेलाचे फायदे :

तिळाच्या तेलात सेसमोल आणि सेसमिनोल नावाचे दोन तत्व आढळतात, जे उपयुक्त अँटिऑक्सिडंट्स असतात. तसंच तिळाच्या तेलात फॅटी अ‍ॅसिड्स असतात जे त्वचेवर मऊपणा आणण्यास मदत करतात.

तिळाचे तेल औषधीय गुणांनी युक्त असतात. तसेच ते अँटिइन्फ्लेमेटरी हि असते. तुमच्या त्वचेवर कोणत्याही कारणाने सूज आली असेल तर तिळाच्या तेलाचा वापर करावा, ती सूज कमी होते.

कोरडेपणामुळे त्वचा फाटते. तुम्ही जर तिळाचे तेल ओठांना लावले तर हे एक उत्तम मॉईस्चराईजर म्हणून काम करते.

तिळाच्या तेलात जखम भरण्याचे घटकही असतात. जर तुमचे ओठ अधिक फाटले असतील तर तिळाच्या तेलाने मसाज केल्यास, ओठांना अधिक चांगला फायदा मिळतो.

चेहरा, हात व त्वचा फाटल्यास, टॅनही होते आणि काळी पडते. तिळाच्या तेलात असणारे विटामिन ई हे कमी करण्यास मदत करते.

त्वचा स्वच्छ राखण्यासाठीही तिळाच्या तेलाचा वापर करतात. हे त्वचेला डिटॉक्सिफाय करण्याचे काम करत असते.

(टीप : आपल्या ज्ञानात अधिक भर पडावी म्हणून हि माहिती केवळ आपल्याला माहित असावी म्हणून दिली जात आहे, हे आपल्या लक्षात असू द्या. याबाबत आपण वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील निर्णय आणि समज करून घ्यावेत. तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी आपल्या वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधावा.)