काश्मिरी नागरिकाच्या मृत्यूनंतर भाजपच्या संबित पात्रांनी केलं Tweet, अभिनेत्री दिया मिर्झा प्रचंड ‘भडकली’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि आंतकवाद्यांमध्ये झालेल्या फायरींगमध्ये एका 60 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. या व्यक्तीचे काही विचलित करणारे फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत. यात दिसत आहे की, या व्यक्तीच्या मृतदेहावर त्याचा नातू बसला आहे. हा फोटो शेअर करत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी वादग्रस्त कमेंट केली आहे. यानंतर अ‍ॅक्ट्रेस दिया मिर्झा आणि संबित पात्रा यांच्यात ट्विटर वॉर सुरू झालं.

संबिता पात्रा यांनी हा फोटो ट्विट करत लिहिलं की, “पुलित्झर लव्हर्स?” पात्रा यांच्या या ट्विटवर अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. दिया मिर्झानं लिहलं की, “तुमच्यामध्ये थोड्या तरी संवेदना बाकी आहेत का?” डायरेक्टर हंसल मेहतांनी लिहिलं की, “हा माणूस तसा तर एका नॅशनल पार्टीचा प्रवक्ता आहे.परंतु प्रत्यक्षात मात्र निव्वळ एक ट्रोल आहे आणि अशा माणसाचा रिपोर्ट करायला हवा.”

यानंतर संबित यांनी दियाला प्रत्युत्तर देत लिहलं की, “होय मॅडम माझ्यात संवेदना आहेत. आपल्या सैन्यासाठी. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी मग तो कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा का असेना. परंतु आमच्या संवेदना तुमच्यासारख्या सिलेक्टीव नाहीत. लक्षात ठेवा मी सिलेक्टीव प्लेकार्ड होल्डर नाहीये. मी तुमचा फॅन आहे. मला हे पाहायचं आहे की, तुम्ही पाकिस्तान प्रायोजित जिहादचा निषेध करत हातात एक प्लेकार्ड घेऊन उभ्या आहात.”

दियानं संबित यांना उत्तर देत लिहिलं की, “संवेदना कधीच सिलेक्टीव नसतात. एकतर त्या असतात किवा नसतात. कोणत्याही मुलाला अशा वेदना आणि भयानक गोष्टींमधून जाण्याची वेळ येऊ नये जसं की, या मुलासोबत होत आहे. तुम्ही तुमचं राजकारण करणं बंद करा. मी तुम्हाला समर्थन देईन. मग माझ्या हाता प्लेकार्ड असो किंवा नसो.”

असं मानलं जात आहे की, संबित यांचं हे ट्विट 2000 साली पुलित्झर अवॉर्ड जिंकणाऱ्या पत्रकारासाठी होतं. या पत्रकारानं जम्मू-काश्मीरमधून आर्टीकल 370 हटवल्यानंतर तिथल्या परिस्थितीबद्दल अनेक फोटो प्रसिद्ध केले होते. आपल्या मार्मिक फोटोसाठी त्याला फिचर फोटोग्राफीमध्ये प्रतिष्ठित पुल्तिझर पुरस्कार 2020 प्रदान करण्यात आला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like