home page top 1

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

येत्या काही दिवसात राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. या निकालाचा सर्वांनी आदर ठेवून शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. तसेच नागरिकांनी सोशल मिडीयासंदर्भात दक्ष रहावे असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पिंपरी चिंचवडचे सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदींसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like