धक्‍कादायक ! आई-वडिल ‘एकत्र’ रहात नसल्याने मुलाला शाळेने प्रवेश नाकारला

 नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘सिंगल पॅरेंट’ असल्याने मुलाला शाळेत प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार नवी मुंबईतील एक इंग्लिश मिडियमच्या शाळेत घडला आहे. यासंबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. नवी मुंबईच्या सेंट लॉरेन्स इंग्लिश हायस्कूलमध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे. यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

सुजाता मोहिते ही महिला आपल्या मुलाला अ‍ॅडमिशन घेण्यासाठी शाळेत घेऊन गेली होती. सुरुवातीला शाळेकडून अ‍ॅडमिशन फुल झाल्याले सांगण्यात आले होते. परंतू नंतर सुजाता मोहिते यांनी आपली ओळख लपवून पु्न्हा सेंट लॉरेंस या शाळेत मुलाच्या अ‍ॅडमिशनसाठी प्रयत्न केला त्यावेळी शाळेने अ‍ॅडमिशन देण्यास होकार दिला.

या घटनेनंतर सुजाता आपल्या मुलाला घेऊन शाळेत गेल्या असता त्यांना पाहून शाळेकडून त्यांच्या मुलाला अ‍ॅडमिशन नाकारण्यात आले. सुजाता अ‍ॅडमिशनसाठी अडून राहिल्यानंतर त्यांच्या मुलाला शाळेत अ‍ॅडमिशन न देण्याचे कारण मुख्यध्यापिकांकडून सांगण्यात आले.

मुख्यधापिकांकडून सांगण्यात आले की ते शाळेत सिंगल पॅरेंट असलेल्या मुलांना अ‍ॅडमिशन देत नाहीत. हे ऐकून सुजाता यांना धक्काच बसला. सुजाता या त्यांच्या पती सोबत राहत नाही.

हा प्रकार घडताना सुजाता यांनी तो त्यांच्या मोबाईल कॅमेराने कैद केला. शाळेविरोधात कडक कारवाईची मागणी सुजाता मोहिते यांनी केली आहे. तसेच सिंगल पॅरेंटच्या मुलांकडे सरकारने विशेष लक्ष देण्याची मागणी देखील त्यांनी केली.

आरोग्य विषयक वृत्त-
कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?
चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार
डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव
केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे