डीएनए द्वारे मृतांची ओळख पटविणार ! आयएसओ 9001- 2015 मानांकित कंपनीत 18 जणांचा मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एसव्ही अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजिस (SV Aqua Technologies) या सॅनिटायझर सह विविध आंतरराष्ट्रीय उत्पादने तयार करणार्‍या कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत १८ जणांना होरळून मृत्यु झाला. त्यातील १७ महिला ज्या ठिकाणी काम करीत होत्या, ती खोली बंदिस्त होती तसेच तेथून बाहेर पडण्याच्या मार्गावर वरील स्लॅब कोसळल्याने त्यांना बाहेर पडण्यास जागाच मिळाली नाही. त्यामुळे खोलीतच त्यांचा होरपळून मृत्यु झाला. या सर्वांच्या मृतदेहांचा जवळपास कोळसा झाला आहे. त्यामुळे त्यांची डीएनए तपासणी करुन ओळख पटविण्यात येणार आहे. एसव्ही अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजिस (SV Aqua Technologies) या कंपनीचा मालक निकुंज शहा याला पौड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एसव्ही अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजीस (SV Aqua Technologies) ही कंपनी क्लोरीन डाय ऑक्साईड उत्पादनांमध्ये जागतिक आघाडीच्या प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे.
पिण्याच्या पाण्याचे उत्पादन करणार्‍या कंपनीत एनएसएफ एएसएफ ६० हे अमेरिका,
कॅनडासह विकसित देशांमधील सर्व पिण्याचे पाणी तयार करण्यासाठी लागणार्‍या साहित्य बनविणार्‍या कंपनीत जे प्रमाण पत्र वापरले जाते.
त्याचा वापर करणारी आपली आशियातील पहिली कंपनी असल्याचा दावा एसव्हीएस अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजीस या कंपनीने केला आहे.
मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत १८ हजार स्केअर फुट जागेत ही कंपनी २०१२ पासून सुरु आहे.

हवा, पाणी आणि जमिनीच्या पृष्ठभागावर वापरली जाणारी रसायने, सिस्टीम आणि सोल्यूशन्सची निर्मिती, पुरवठा आणि निर्यातीत एक अग्रगण्य नाव म्हणून कंपनी उदयाला आली आहे.
असा दावा कंपनीकडून करण्यात येत होता.
मात्र, अशा जागतिक दर्जाचा दावा करणार्‍या या कंपनीत सुरक्षाविषयक कोणत्याच नियमांचे पालन केले गेल्याचे दिसून आले नाही.
कंपनीच्या उत्पादनात ज्वालाग्रही पदार्थांचा वापर होत असला तरी तेथे अग्निशमन यंत्रणा, कोठेच दिसून आली नाही.
साधे अग्निशमनाचे सिलेंडरही नसल्याचे बचाव कार्यात भाग घेतलेल्या लोकांनी सांगितले.

पाणी शुद्ध करण्याच्या गोळ्या बनविण्याचे काम येथे होते.
यासाठी आरएम १ नावाचे रसायन वापरले जाते.
ते ज्वालाग्रही आहे. त्याचे पॅकेजिंग सुरु असताना शॉर्ट सर्किट होऊन दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे.
सोमवारी लागलेल्या आगीत या कंपनीची संपूर्ण इमारत जळून खाक झाली आहे.
आग विझविण्यात आली असली तरी मंगळवारी सकाळीही खिडकीतून आगीच्या छोट्या ज्वाळा दिसून येत होत्या. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ जणांची समिती नेमली असून त्यांना आजच आगीचा अहवाल देण्याची सूचना करण्यात आली आहे.

एसव्हीएस अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजीस या कंपनीचा मालक निकुंज शहा याला पौड पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आज त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देतंय वार्षिक 42000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळेल फायदा

COVID-19 in India : देशात 63 दिवसानंतर एक लाखापेक्षा कमी कोरोना केस, एकुण मृत्यूंचा आकडा 3.5 लाखांच्या पुढे

प्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 

फेसबुक पेज लाईक करा

ट्विटर ला देखील फॉलो करा