Dnyaneshwar Katke | ‘तुळापुरातील स्मारकासही आराखड्याप्रमाणे तातडीने निधी मंजूर करावा’; शिवसेनेच्या ज्ञानेश्वर कटके यांच्या मागणीची दखल घेत आदित्य ठाकरेंनी दिलं ‘हे’ आश्वासन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हवेली तालुक्‍यातील वढू बुद्रुक (Vadhu Budruk) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक (Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial) उभारणीस शासनाकडून मंजूरी (Government Approval) देण्यात आली असून निधीही मंजूर करण्यात आला आहे. याच पार्श्‍वभूमीवर तुळापूर (Tulapur) येथील स्मारकाचा प्रस्तावित आराखडा तयार असून तो वरिष्ठ कार्यालयाकडे सादरही करण्यात आला आहे. त्यानुसार तुळापुरातील स्मारकासही आराखड्याप्रमाणे तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी पर्यावरण-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे शिवसेना (Shiv Sena) जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके (Dnyaneshwar Katke) यांनी केली होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापुरातील स्मारकासही निधी मंजुर केला जाईल, असे आश्‍वासन ठाकरे यांनी ज्ञानेश्‍वर कटके (Dnyaneshwar Katke) यांना दिले आहे.

तुळापूर आणि वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक साकारण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात नुकतीच विशेष बैठक घेण्यात आली. यामध्ये वढु बुद्रुक येथील स्मारकाच्या आराखड्यावर चर्चा होऊन 50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अनुषंगाने तुळापुरातील स्थानिक ग्रामस्थांसह शंभुभक्‍तांच्या भावनांचा विचार करून तुळापूर येथील प्रस्तावीत स्मारकाच्या आराखड्यासही निधी मंजूर (Funding Approved) करण्यात यावा, अशी मागणी विनंती पर्यटनमंत्री ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे ज्ञानेश्‍वर कटके (Dnyaneshwar Katke) तसेच माऊली शिवले (Mauli Shivale) यांनी केली होती. तुळापुर ग्रामपंचायतीकडूनही यासंदर्भात निवेदन देण्यात आले. सरपंच अॅड. गुंफा इंगळे, उपसरपंच नवनाथ शिवले, सदस्य दत्तात्रय खैरे, शिवाजी शिवले, अर्चना पुजारी, सुवर्णा राऊत, सुनिता शिवले, सुरेखा शिवले, सुनिता नवनाथ शिवले यांनीही तुळापुरातील स्मारकाबाबत निधीची मागणी केली आहे.

दरम्यान, पर्यावरण-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी जिल्हा शिवसेना प्रमुख ज्ञानेश्‍वर कटके, माऊली शिवले यांच्यासह इतरांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेत तुळापुरातील स्मारकाचा आराखडा तसेच त्याअनुषंगाने चर्चा करून याबाबत निधी मंजूर करावा, अशी विनंती केली. यावर याबाबत तातडीने हालचाली करण्यात येतील, निधी मंजुरीबाबत प्रयत्न सुरू असल्याचे ठाकरे यांनी कटके यांच्यासह उपस्थितांना सांगितले.

शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांनी सांगितले की, तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी, त्यावर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखो नागरिक येतात. महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून स्मारकाचे तसेच परिसराच्या विकासाचे काम तातडीने करण्यात यावे. यासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title : Dnyaneshwar Katke | ‘Funds should be sanctioned immediately for the memorial in Tulapur as per the plan’; Taking note of Shiv Sena’s Dnyaneshwar Katke’s demand, Aditya Thackeray gave ‘this’ assurance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Tukaram Supe | ‘मन:स्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते’ – तुकाराम सुपे

Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार