आळंदीहून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान, गांधीवाड्यात मुक्काम

आळंदी : पोलीसनामा ऑनलाईन

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने शुक्रवारी सायंकाळी विठ्ठलाच्या नामघोषात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून अलंकापुरीत दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या मुखी ‘माऊली-माऊली’ हा एकच जप होता. सायंकाळी माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणा पूर्ण करून गांधीवाडय़ात (आजोळी) एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावली.
[amazon_link asins=’B00UFF422M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5a451ae2-8138-11e8-b01f-432e06727639′]

माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा याचि देही याचि डोळा साठवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून एकेक दिंड्या शनिवारी सकाळपासून मोठ्या संख्येने आळंदीत दाखल झाल्या होत्या. प्रस्थानापूर्वी पहाटे पावणेतीन ते साडेचार घंटानाद, काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर पहाटे साडेचार ते दुपारी बारावाजेपर्यंत भाविकांनी महापूजा व समाधी दर्शन घेतले.

दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत श्रींना नैवेद्य दाखवण्यात आला. दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत प्रस्थान सोहळ्यातील मानाच्या ४७ दिंड्यांना प्रवेश देण्यात आला. तसेच श्रींना पोषाख चढवण्यात आला आणि माऊलीच्या पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली आणि लाखो वारकऱ्यांनी केलेल्या ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात पालखीने पंढरीकडे प्रस्थान ठेवले.