गर्भनिरोधक गोळ्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या…

पोलीसनामा ऑनलाइन – गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक जणीं गर्भनिरोधक गोळ्या घेतात. गर्भनिरोधक गोळ्यांविषयी स्त्रियांकडे बरेच प्रश्न आहेत जसे की यामुळे वजन वाढू शकते का ? गोळ्या घेतल्यानंतर गर्भधारणा होण्याची शक्यता आहे का? नंतर आई होण्यासाठी काही समस्या होणार नाहीत ना? गर्भनिरोधक गोळ्यांशी संबंधित असे काही प्रश्न ……

१) गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वजन वाढते का ?
गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने वजन वाढत नाही. खरं तर, बहुतेक मुली विवाहानंतर २३ _२४ व्या वर्षी गोळ्या घेणे सुरू करतात आणि या वयात त्यांचे वजन वाढते याचे कारण फ्लूइड रिटेंशन असू शकते, ज्याचा तात्पुरता प्रभाव पडतो. गोळ्या घेतल्यानंतर स्तनामध्ये जडपणा, चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी इत्यादी समस्या होऊ शकतात.

२) गर्भनिरोधकांमुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकतो का ?
कधीकधी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास मासिक पाळी अनियमित होते म्हणून घाबरून जाण्याची किंवा गोळ्या बंद करण्याची गरज नसते. मासिक पाळी ३ महिन्यांत स्वतः नियमित होते.

३) गोळ्यांमुळे कंसीव होणे कठीण होणार नाही का ?
गर्भधारणा टाळण्यासाठी जगभरातील महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात. यामुळे भविष्यात कोणतीही समस्या उद्भवणार नाही आणि वंध्यत्वही उद्भवणार नाही. गोळ्या बंद केल्यावर, आपण गर्भधारणा करू शकता. याबद्दल आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधा.

४) गोळ्या घेतल्यानंतरही गर्भवती होऊ शकता का ?
या गोळ्या योग्यवेळी आणि योग्य रीतीने घेतल्यास ९९% कार्य करतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की न विसरता योग्य वेळी गोळ्या घेतल्यास १०० स्त्रियांपैकी केवळ १ महिलाच गर्भवती होण्याची शक्यता असते.

५) आपण गोळी घेणे विसरल्यास काय करावे ?
गर्भनिरोधक गोळ्याचा प्रभाव २४ तास टिकतो, परंतु जर आपण कोणत्याही कारणास्तव गोळी घेणे विसरलात तर ते गर्भधारणेची शक्यता वाढवते. अशा परिस्थितीत, १_२ तासांच्या आत औषध घेण्याचा प्रयत्न करा. जितक्या लवकर आपण औषध घ्याल तितका फायदा होईल.