रवी शास्त्री संतापले, म्हणाले – ‘मी संघात काय तबला वाजवायला आहे का’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री संतापलेले पाहायला मिळाले. भारतीय संघातील एका खेळाडूविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी संतापून मी संघात काय तबला वाजवायला आहे का ? असा प्रश्न विचारला. काही दिवसांपूर्वी रवी शास्त्री यांनी या खेळाडूविषयी वक्तव्य केले होते. त्याच खेळाडूविषयी प्रश्न विचारला असता शास्त्रींनी हे संतापजनक उत्तर दिले.

विंडीज दौऱ्यावर एका सामन्यात रिषभ पंत फलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे संतापलेल्या रवी शास्त्री यांनी पंत याला ताकीद दिली. या सामन्यात भारतीय संघाला गरज असताना रिषभ पंत चुकीचा फटका खेळून बाद झाला. यामुळे जर पंत असाच खेळत राहिला तर त्याला भारतीय संघात स्थान मिळणार नसल्याचे शास्त्री यांनी म्हटले होते. मात्र आता शास्त्री यांनी त्यांचे मत बदलले असून, एका मुलाखतीत त्यांनी म्हटले कि, एखाद्या खेळाडूचे काही चुकत असेल तर त्याला सांगणे माझे कर्तव्य आहे. तसेच मला संघात काही तबला वाजवायला ठेवलेले नाही, असेदेखील म्हटले.

पंत हा चांगला खेळाडू असून त्याला पाठिंबा देण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच रोहित शर्मा यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले कि, रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यांत उत्तम सलामीवीर असून तो या मालिकेत सलामीला खेळणार आहे. मात्र लगेच त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा करू नये. 5 व्या किंवा 6व्या क्रमांकावरून थेट सलामीला खेळणं तितकं सोपं नाही. त्यामुळे त्याला काही वेळ द्यावा लागणार आहे. तो यामध्ये देखील यशस्वी ठरेल असा आम्हाला विश्वास असून त्याला आम्ही अनेक संधी देणार आहोत.

दरम्यन, भारतीय संघ टी-20 मालिकेनंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे क्रीडा रसिकांचे याकडे लक्ष लागून आहे.

Visit : policenama.com