सूडबुद्धीने कारवाई नको, ‘वंचित’कडून शरद पवारांची ‘पाठराखण’

अकोला : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने नोटीस पाठवल्यानंतर त्यांना राज्यभरातून जोरदार पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने देखील शरद पवार यांची पाठराखण केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी नको अशी ठाम भूमिका मांडलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात मात्र शरद पवार यांना एकप्रकारे पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितल्यानुसार एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे कि, शरद पवार यांची केली जाणारी चौकशी हि राजकीय सुडापोटी व सूडबुद्धीने होऊ नये.

त्यामुळे पवार हे त्या बँकेवर कधीही अध्यक्ष नसल्याने त्यांच्यावर कारवाई होणे अवघड आहे. तसेच ईडीच्या धमक्या देऊन हे भाजप -शिवसेना सरकार विरोधकांना  संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील या पत्रकातून करण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारला लोकशाही मार्गाने चालण्याचा सल्ला देखील यामधून देण्यात आला आहे.

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवत असून त्यांनी एमआयएम बरोबर या निवडणुकीत आघाडी केलेली नाही.

Visit : policenama.com