पहिल्या ‘डेट’ वर जाताना ‘या’ गोष्टींची अजिबात चर्चा करू नका, अन्यथा होईल ‘ब्रेकअप’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जेव्हा तुम्हाला पहिल्यांदाच डेटवर जायचे असते तेव्हा तुमच्या मनात नक्कीच एक वेगळी खळबळ असते. मनात अनेक प्रकारचे प्रश्न येतात की समोरचा व्यक्ती कसा असेल , त्याच्याशी काय संभाषण होईल. एवढेच नाही, आपण डेटवर जाण्यासाठी अनेक प्रकारच्या तयारी देखील कराल परंतु सर्व तयारी नंतरही आपली डेट आपण विचार केल्याप्रमाणे झाली नाही तर आपण नक्कीच निराश व्हाल.

खरं तर, चांगल्या डेटसाठी एक चांगला पोशाख असणे महत्वाचे नाही तर आपण एकमेकांशी कसा संवाद साधता हे महत्वाचे आहे. डेटच्या वेळी बर्‍याच वेळा आपण अशा बर्‍याच गोष्टी करु लागतो ज्या आपल्याला आवडतील पण त्या गोष्टी समोरच्यासाठी कंटाळवाण्या होऊ शकतात. विशेषत: जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखत नाही, तेव्हा काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. जाणून घ्या पहिल्यांदा डेटवर जाताना कोणत्या गोष्टींवर चर्चा करू नये.

अज्ञात लोकांबद्दल बोलू नका
बर्‍याच वेळा असे घडते की जेव्हा तुम्ही डेटवर जातो तेव्हा आपण आपल्या ओळखीच्या लोकांबद्दल बोलू लागतो, परंतु समोरच्या व्यक्तीला त्याबद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे अशा व्यक्तींबद्दल बोलताना विचार करा.

एखाद्या तिऱ्हाईत व्यक्तीबद्दल काही प्रमाणात बोलणे ठीक आहे, परंतु आपण दुसर्‍या व्यक्तीबद्दल बोलत राहिल्यास आपला जोडीदाराला कंटाळा येईल. जर आपण एखाद्या तिसर्‍या व्यक्तीबद्दल बोलत असाल तर अशा प्रकारे एकमेकांचे स्वभाव, आवडी-निवडीबद्दल जाणून घेऊ शकणार नाही.

जास्त विनोद करू नका
आपण पहिल्यांदाच डेटवर जात असाल किंवा ज्याला आपण चांगले ओळखत नाही अशा एखाद्या व्यक्तीला आपण भेटत असाल तर जास्त विनोद करू नका. समोरच्या व्यक्तीवर कशाचीही थट्टा करू नका. यामुळे त्यांना वाईट वाटू शकते. आपल्याला आवडलेला विनोद, कदाचित समोरच्या व्यक्तीला आवडत नसेल. यामुळे समोरच्या व्यक्तीवर आपल्याबद्दल चुकीची छाप पडू शकते.

वैयक्तिक समस्येवर चर्चा करू नका
प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी समस्या असतात , मात्र याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा आपल्या समस्येबद्दल बोलण्यास सुरुवात करावी. यातून अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते . यामुळे डेट खूप कंटाळवाणी होते. दुसरीकडे, बर्‍याच वेळा समोरची व्यक्ती आपल्या वैयक्तिक समस्या ऐकून त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करते. म्हणून जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीस अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेत नाही तोपर्यंत अशा गोष्टी बोलणे टाळा.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

You might also like