Google वर चुकूनही ‘हे’ करू नका सर्च, होऊ शकते मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात इंटरनेटच्या वापरात वाढ दिसून आली आहे. यासोबतच ऑनलाइन फ्रॉडची प्रकरणे सुद्धा वेगाने वाढत आहेत. हॅकर्स यूजर्सची सर्वात जास्त फसवणूक गुगलवर करतात. गुगलवर लोक नेहमी अशी माहिती सर्च करतात जी आपल्यासाठी नुकसानकारक असते. हॅकर्स अशा सर्चसाठी वाट पहात बसलेले असतात आणि तुम्ही सर्च करताच फसवणूक केली जाते. आम्ही तुम्हाला अशा काही सर्चबाबत सांगणार आहोत जे कधीही करू नयेत.

बँकेची माहिती घेऊ नका
काही फेक वेबसाइट्स आपले नाव बँकांच्या नावावर ठेवतात, आपण बँकेचे नाव सर्च करताच, त्यांच्या जाळ्यात अडकू शकता. यासाठी Google वर URLs सर्च करा.

सर्च करू नका कस्टमर केयरचा नंबर
ऑनलाइन कस्टमर केयरचा नंबर सर्च करणे खुप धोकादायक ठरू शकते. सायबर गुन्हेगार याचीच वाट पहात असतात. सायबर गुन्हेगार नकली साइट बनवून नकली नंबर आणि नकली ईमेल आयडी टाकून ठेवतात आणि तुम्ही त्यामध्ये फसता.

गुगलला डॉक्टर समजू नका
प्रकृती बिघडली, काही आजार असेल तर काही डॉक्टरकडे जाण्याएवजी लोक गुगल सर्च करून औषध सर्च करतात. परंतु, अशा चुकीमुळे तुमचा जीव सुद्धा जाऊ शकतो. गुगल तुमच्या जीवनातून डॉक्टरला हटवू शकत नाही. गुगलवरील औषधे प्रतिबंधित असू शकतात. ज्यामुळे तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते.

सरकारी वेबसाईटवरून घ्या माहिती
कोणत्याही सरकारी वेबसाइटसाठी गुगल सर्च करू नका, तर तिचा युआरएल टाकून साइटवर जा. सरकारी साईट गुगल सर्च करणे धोकादायक ठरू शकते. कारण सरकारी साइट्स अटॅकर्ससाठी प्रायमरी टार्गेट असतात आणि गुगलवर त्या सर्च केल्यानंतर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू शकता.