’या’ 2 समस्यांमध्ये रात्री चुकूनही करू नये हळदीच्या दुधाचं सेवन, जाणून घ्या सविस्तर माहिती

सध्या कोरोनाची संकट सुरू असल्याने अनेकजण संसर्ग टाळण्यासाठी विविध घरगुती उपाय करत असतात. यामध्ये गरम पाणी पिणे, वाफ घेणे, हळदीचे दुध पिणे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा घेणे, असे उपाय लोक करतात. हळदीचे दुध सुपर ड्रिंक असले तरी काही स्थितीत हळदीच्या दुधाचे सेवन नुकसाकारक ठरू शकते. हे दुध कोणत्या समस्यांमध्ये घेऊ नये आणि त्याचे दुष्परिणाम जाणून घेवूयात…

या आहेत त्या समस्या

1 कफ बाहेर न पडणे
छातीत कफ जमा होण्याची समस्या अनेकांना असते. शरीरातील कफ बाहेर पडत नसल्यास हळदीच्या दुधाचं सेवन करू नका. हळदीचं दूध प्यायाल्यानं कफ छातीत जमा राहतो. हळदीमुळे कफ सुकतो.

2 श्वासाचा त्रास
श्वास घेण्याचा त्रास होत असल्यास रात्री झोपताना हळदीच्या दूध पिऊ नये. अन्यथा त्रास वाढण्याची शक्यता असते.

हळदीचं दूध असं तयार करा
हळदीच्या पावडर ऐवजी हळकुंड जास्त परिणामकारक आहे. काही हळकुंड घेऊन ती वाटून ठेवा. यामध्ये काळी मिरीची पावडर मिसळू शकता. एक कप दूधात ही कुटलेली हळद आणि मिरी पावडर मिसळा. 20 मिनिटांपर्यंत उकळल्यानंतर गाळून घ्या त्यामध्ये एक चमचा मध टाकून प्या.

(टिप : वरील मजकूर माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असल्याने कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)