‘या’ 2 समस्या असतील तर चुकूनही करू नका हळदीच्या दुधाचं सेवन ! जाणून घ्या हे दूध बनवण्याची योग्य पद्धत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : हळदीच्या दुधाला सुपर ड्रिंक म्हटलं जातं. रात्री झोपताना अनेकजण याचं सेवन करतात. हळद आणि दूधात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुण असतात. हळद अँटी व्हायरल, अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांनी युक्त असते. यामुळं अनेक आजारांसोबत लढण्यासाठी याची खूप मदत होते. अनेकदा यात पोषक घटक जास्त असल्यानं सर्रास या दुधाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु काही स्थितीत हळदीचं दूध हे शरीरावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतं. नेमकं कधी हळदीचं दूध घेऊ नये आणि हे बनवण्याची योग्य पद्धत काय आहे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

पुढील स्थितीत हळदीच्या दुधाचं सेवन करणं टाळावं.
1) कफ बाहेर येत नसेल तर हळदीचं दूध घेऊ नये
छातीत कफ जमा होण्याची समस्या अनेकांना येत असते. जर छातीत जमा होणारा हा कफ बाहेर पडत नसेल तर अशा स्थितीत हळदीच्या दुधाचं सेवन करू नये. कारण या दुधाचं सेवन केलं तर कफ तसाच छातीत जमा राहतो. हळदीमुळं कफ सुकतो. जर तुम्हाला याचं सेवन करायचंच असेल तर गरम पाण्यात हळद टाकून तुम्ही याचं सेवन करू शकता.

2) श्वास घ्यायला त्रास होत असेल तर
जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास वाटत असेल तर अशा स्थितीत हळदीच्या दुधाचं सेवन करू नये. कारण हळदीत असणाऱ्या गुणधर्मांमुळं श्वसनप्रणाली अतिसक्रिय होऊन श्वास घेण्यास होत असलेला त्रास आणखी वाढू शकतो. म्हणून तर तुम्हाला श्वास घ्यायला काही त्रास वाटत असेल किंवा यासाठी तुम्ही एखाद्या पंपाचा वापर करत असाल तर हळदीच्या दुधाचं सेवन करू नये. कोणत्याही व्यक्तीसाठी 20 ते 40 mg एवढं हळदीचं सेवन पुरेसं असतं. याचं जास्त सेवनही चांगलं नाही.

हळदीचं दूध तयार करण्याची योग्य पद्धत
अनेकजण या दूधासाठी कुटलेली हळद वापरतात. यासाठी तुम्ही हळकुंडाचा वापर केला तर जास्त प्रभावी ठरतं. हे दूध बनवण्यासाठी पुढील प्रमाणे कृती करा.

– एक हळकुंड घेऊन ते वाटून घ्या
– यात काळ्या मिरीची पावडर एकत्र करा
– आता एक कप दूध घ्या
– यात कुटलेली हळद आणि ही मिरीची पावडर टाका.
– आता हे मिश्रण 20 मिनिटांपर्यंत उकळून घ्या
– हे मिश्रण गाळून घ्या
– आता यात 1 चमचा मध टाका.
– तुमचं हळदीचं दूध तयार आहे. आता तुम्ही याचं सेवन करू शकता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.