थंडीमध्ये चुकून देखील ‘या’ 6 गोष्टीचं सेवन नका करू, फायद्याऐवजी होईल मोठं नुकसान, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळ्यात लोकांना अधिकाधिक अशा गोष्टींचे सेवन करणे आवडते, ज्यामुळे त्यांच्या शरीरात उष्णता निर्माण होईल. परंतु अशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या खाण्याने शरीर उबदार होते. परंतु त्यांच्या सेवनामुळे शरीराला फायद्याऐवजी तोटा सहन करावा लागू शकतो. जाणून घेऊ त्या गोष्टी..

१) दूध
दूध हे कॅल्शियमचे योग्य स्त्रोत आहे. त्याच्या सेवनाने स्नायू आणि हाडे उबदार आणि मजबूत होतात. परंतु हिवाळ्यात जास्त प्रमाणात दूध पिल्याने घशातील समस्या उद्भवू शकते. त्याचा प्रभाव थंड आहे, कफ आणि श्वसन समस्येचा धोकादेखील वाढू शकतो.

२) मांस
मांसामध्ये आणि अंड्यांमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात. हे शरीरास ऊर्जा आणि उबदारपणा देण्यास मदत करतात. परंतु हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने घशाची समस्या उद्भवू शकते. त्याऐवजी हिवाळ्यात आपण आपल्या आहारात मासे खाऊ शकता.

३) चहा आणि कॉफीचा जास्त प्रमाणात सेवन
शरीरास उबदार ठेवण्यासाठी बर्‍याचदा लोक हिवाळ्यात कॉफी, चहा आणि गरम चॉकलेटचे अधिक सेवन करतात. परंतु त्यामध्ये जास्त चरबी आणि कॅफिनमुळे वजन वाढणे आणि डी-हायड्रेटची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात.

४) हंगामातील फळांचे सेवन करणे
योग्य वेळी योग्य फळे खाल्ल्यास फायदा होतो. अशा परिस्थितीत चुकीच्या वेळी खाल्लेले पौष्टिक आहार आरोग्यास हानी पोहोचवते. यासाठी नेहमीच ताजे आणि हंगामी फळे खा.

५) मिठाईचे जास्त सेवन
तज्ज्ञांच्या मते जास्त प्रमाणात गोड खाणे प्रतिकारशक्ती कमकुवत करते. शरीरात बॅक्टेरियांच्या वाढीमुळे आजार उद्भवू शकतात. यासाठी आजारांपासून वाचण्यासाठी गोड खाणे नियंत्रणात ठेवले पाहिजे.

६) मद्यपान करणे टाळा
हिवाळ्यात अधिक थंडी असल्याने आणि त्यात तहान ही कमी प्रमाणात लागते, त्यामुळे लोक या हंगामात लोक कमी पाणी पितात. सर्दी टाळण्यासाठी जास्त मद्यपान करतात. परंतु यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. शरीरात योग्य प्रमाणात पाण्यामुळे पाचन क्रिया मजबूत होते. तसेच शरीरात असलेली घाण बाहेर पडण्यास मदत करते. अशा परिस्थितीत जास्त प्रमाणात मद्यपान करणे टाळा.

You might also like