दिल्लीत जाऊ नका म्हणून ‘या’ भाजपच्या नेत्यानं फडणवीसांना केली ‘हात’ जोडून विनंती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दिल्ली निवडणुकी नंतर देवेंद्र फडणवीस याना केंद्रीय मंत्री मंडळात किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या एका मोठ्या संघटनात्मक पदाची जबाबदारी असल्याची माहिती दिली जात आहे . मात्र भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी अशी विनंती केली आहे कि फडणवीस यांनी दिल्लीत जाऊ नये.

लोणीकर परभणी येथील एका कार्यक्रमात बोलत असताना म्हणाले कि इस्रायेलच्या धर्तीवर 20 हजार कोटींच्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मंजुरी दिली. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांना शेतीसाठी मुबलक पाणी आणि पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी फक्त फडणवीसचं काम करू शकतात त्यामुळे तुम्ही दिल्लीत जाऊ नये अशी विनंती बबनराव लोणीकर यांनी फडणवीसांना केली.

तर भाजप चे नेतृत्व म्हणून फडणवीस यांना लवकरच राज्यसभेवर पाठविणार असून त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या चर्चेमुळे भाजपचे राज्यातील आमदार आणि इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेले नेते , आमदार यांच्यात निराशा आहे. हे सर्व झाल्यानंतर फडणवीस यांना विचारले असता तेव्हा ते म्हणाले मी कुठेही जाणार नाही.