‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या

अशा अनेक वस्तू असतात ज्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात त्या हानिकारक असतात. कारण अनेक फूड्स असे असतात ज्यांची पाने आणि बी इत्यादी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे फूड्स कोणते आहेत आणि त्याचे सेवन केल्याने तुम्ही कसे आजारी पडता ते जाणून घेवूयात…

1 हिरवा बटाटा
भाजीत हिरवा बटाटा दिसला तर तो खाऊ नका. यामध्ये ग्लायकोसाईड नावाचा विषारी पदार्थ असतो. याच्यामुळे उलटी, लूज मोशन आणि डोकेदुखीची समस्या होऊ शकते.

2 जंगली मशरूम
मशरूम आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे, परंतु जंगली मशरूम कधीही खाऊ नका. याच्या सेवनाने पोटदुखी, लूज मोशन, उलटी आणि लिव्हरच्या समस्या होतात.

3 चेरीचे बी
चेरीचे बी खाणे आरोग्यासाठी घातक आहे. यामध्ये विषारी अ‍ॅसिड असते.

4 सफरचंदचे बी
सफरचंद आरोग्यासाठी लाभदायक आहे, पण त्याचे बी चुकूनही खाऊ नका. सफरचंदाच्या बीमध्ये काही प्रमाणात सायनाईड असते जे शरीराला नुकसान पोहचवते. श्वास घेण्यास त्रास होतो.

5 दालचीनी
दालचीनीत आरोग्यासाठी असंख्य गुण आहेत. मात्र दालचीनीची पावडर श्वासासह शरीरात गेल्यास फुफ्फुसात जळजळ होते.