ही तर अपेंडिक्सची लक्षणं, वेळीच लक्ष द्या

पोलीसनामा ऑनलाइन – अपेंडिक्स हा आतड्यांचा २ ते ३ इंच लांबीचा एक छोटासा भाग असून तो पातळ आणि छोट्या ट्यूबसारखा असतो. अपेंडिक्सला दोन तोंड असतात. एक बंद तर दुसरे उघडे असते. अपेंडिक्सच्या उघड्या तोंडातून अन्न आतमध्ये गेल्यास ते बाहेर येऊ न शकल्याने अपेंडिक्समध्ये इन्फेक्शन होतं आणि पोटात वेदना होतात.

अपेंडिक्समुळे पोटात वेगवेगळ्या ठिकाणी वेदना होतात. पोटाच्या खालच्या भागात वेदना होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जर पोटात अपेंडिक्समुळे वेदना होत नसेल तर एकाच जागेवर वेदना होतात. मात्र, अपेंडिक्समध्ये होणाऱ्या पोटदुखीची जागा सतत बदलते. आणि पोटात होणारी वेदना काही तासातच असह्य होते. पोटात जास्त गॅस होणे हे सुद्धा अपेंडिक्सचे लक्षण आहे. अनेकदा डाळ, राजमा, छोले, ब्रॉकली, कोबी आणि डेअरी प्रॉडक्ट आहारात आल्यास पोटात गॅस तयार होतो. पोटात गॅस तयार होण्यासोबतच सतत दुखत असेल आणि गॅस सुटून आराम मिळत नसेल तर हे अपेंडिक्सचे लक्षण असू शकते.

जुलाब होणे हे सुद्धा अपेंडिक्सचे लक्षण आहे. पोट साफ नसल्यास लूज मोशन होत असल्यास हे सुद्धा अपेंडिक्सचे लक्षण असू शकते. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये अपेडिंक्सची वेगवेगळी लक्षणे असू शकतात. उलटी आणि चक्कर ही सुद्धा अपेंडिक्सची लक्षणे आहेत. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अपेंडिक्समुळे शारीरिक हालचालीत अडचण येते. अपेंडिक्समुळे पोटात होणाऱ्या वेदना या थोडा वेळ बेडवर झोपल्याने किंवा शांतपणे बसून राहिल्याने दूर होते नाही. या वेदना सतत होत राहतात आणि शारीरिक हालचाल केल्यास वेदना वाढतात. खोकला आणि शिंकल्यावरही पोटात वेदना होतात.