‘कोरोना’ काळात घराबाहेर जाताना ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी विसरण्याची चूक करू नका, ही आहे संपूर्ण लिस्ट जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – घराबाहेर पडताना पर्स आणि सेलफोन सारख्या वस्तूंसह आपल्याबरोबर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी बाळगण्यास विसरू नका. या महत्वाच्या गोष्टी घरी विसरणे म्हणजे सर्वात मोठी चूक करणे आहे. विशेषत: कोरोना संक्रमण काळात, त्या आणखी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. कोविड -1 ने आपले जीवन बर्‍यापैकी बदलले आहे, शिवाय आपला प्राधान्यक्रम देखील बदलला आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक झाले आहे. जेणेकरुन रोगास कारणीभूत जंतू आणि जीवाणूंच्या संपर्कात येऊ नये. कोरोना आपत्ती काळात आपल्याबरोबर ठेवावयाच्या पाच अत्यावश्यक गोष्टींची यादी जाणून घेवूयात…

1 मास्क
कोरोना संकटात आणि वाढत्या प्रदूषणाची पातळी लक्षात घेता, घर सोडताना मास्क घालायला कधीही विसरू नका. मास्क बाहेरील जंतू आणि बॅक्टेरिया शरीरात येऊ देत नाही. म्हणून मनात पक्क करा की, जेव्हा आपण घराबाहेर पडू तेव्हा चेहर्‍यावर मास्क असेल.

2 सॅनिटायझर
जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपण शॉपिंग कार्ड, डोअर नॉब, पिशव्या अशा अनेक गोष्टींच्या संपर्कात येतो. अशा परिस्थितीत त्या वस्तूंच्या पृष्ठभागावर कोणते विषाणू आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही. कोविड संसर्ग रोखण्यासाठी, हात स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. 20 सेकंद साबण आणि पाण्याने हात धुणे हे रोगास कारणीभूत विषाणूंना नष्ट करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. परंतु पाणी, साबण नसताना सॅनिटायझर हा दुसरा सर्वात चांगला पर्याय आहे. कमीतकमी 60 टक्के इथेनॉल किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोल असलेली सॅनिटायझरची बाटली नेहमी सोबत ठेवा.

3 जंतुनाशक नेहमीच जवळ ठेवा
प्रवास करत असताना सोबत जंतुनाशक असावे. कारण आपण अनेक वस्तूंना सतत स्पर्श करत असतो. कार किंवा बॅकपॅकमधील पृष्ठभाग स्वच्छ करत राहा. कारचे दरवाजे, सेल फोन, शॉपिंग कार्ड या सर्व गोष्टी जीवाणू आणि व्हायरसच्या आधार आहेत. त्या 7.5 टक्के हायड्रोजन पेरोक्साईड असलेल्या जंतुनाशक क्लीनरसह साफ कराव्यात.

4 टिश्यू
केवळ साथीच्या वेळीच नव्हे तर टिश्यू नेहमीच आपल्याबरोबर ठेवणे आवश्यक आहे. खोकला आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकणे, चेहरा पुसणे, दरवाजांची सफाई करणे, लिफ्टची बटणे हाताळणे आणि स्पर्श करणे यासारख्या अनेक कारणांसाठी तो वापरता येतो. जंतू आणि जीवाणूंच्या संपर्कात न येण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे.

5 पाण्याची बाटली
सर्व हंगामात स्वत:ला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, बाहेर पडताना पाण्याची बाटली आपल्यासोबत ठेवा. वॉटर कूलरचा वापरत असाल तर जंतूंच्या संपर्कात येण्याचा धोका वाढतो.