शेविंग करताना ‘हा’ खास फंडा वापरा, नाही येणार त्वचेवर बारीक दाणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती बंद असलेली सलून दुकाने पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. मात्र सलून दुकानांमध्ये फक्त केस कापण्यासाठीच परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे अनेकांना आठवड्यातून एकदा तरी सलूनमध्ये जाऊन दाढी करणाऱ्यांना आता घरच्याघरीच आपली दाढी करावी लागतं आहे.

सलूनमध्ये दाढी केल्यानंतर मसाज आणि दाढी करण्याची क्रिया योग्य रीतीने होत असल्यामुळे जळजळण्याचा त्रास होत नाही. मात्र, अनेकदा घरी शेविंग केल्याने केसांची वाढ व्यवस्थित होत नाही. त्वचेला सूज येते. त्वचा लाल होते. काहीवेळा पिंपल्स येतात. अशा समस्या निर्माण होतात. तर आज आम्ही तुम्हाला शेविंग करताना कोणती काळजी घ्यायची याबाबत सांगणार आहोत.

१. काही जण सतत एकाच ब्लेडने दाढी करतात. त्यामुळे त्वचा खराब होते. ब्लेडला धार असेल तर वारंवार वापरायला हरकत नाही असे अनेकांना वाटते. मात्र, चार ते पाच वेळा शेविंग केल्यानंतर ब्लेड बदलायला हवा. नाहीतर त्वचेचं नुकसान होऊ शकतं. तसेच अनेकदा जुन्या ब्लेडचा वापर केल्यामुळे त्वचा कापली जाण्याची शक्यता असते. जुन्या गंज लागलेल्या ब्लेडच्या वापरामुळे त्वचेवर रक्त येणं, पु तयार होणं असे त्रास जाणवू शकतो.

२. योग्य शेविंग क्रीमचा वापर करा. अलिकडे त्वचेच्या नुसार क्रीम बाजारात उपलब्ध असतात. शेविंग क्रीमचा वापर केल्यामुळे जर त्वचेवर दाणे येत असतील तर शेविंग फोमचा वापर करा. क्लिन शेव ठेवण्यासाठी रोज शेविंग करणं गरजेचं नसते. त्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकत. तुमच्या दाढीचे केस पूर्ण वाढू द्या. मगच शेविंग करा.

३. शेविंग करत असताना हलक्या हाताने रेजर फिरवा. फिरवत असताना ताकद लावण्याची काही सुद्धा गरज नाही. कारण ब्लेडला धार असल्याने रेजर हलक्या हाताने फिरवलं तरी काम होते. जोरात रेजर फिरवल्यामुळे खाज सुटण्याची शक्यता असते. शेविंग करताना शक्यतो थंड पाण्याचा वापर करु नका. त्यामुळे त्वचा कडक होते आणि शेविंग करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणून त्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like