शरीराच्या ‘या’ भागावरील केस चुकूनही उपटून किंवा ओढून काढू नका ! जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन – शरीराच्या काही भागावर असे केस असतात जे नको असतात. अशात काही लोक ते उपटूनही किंवा ओढून काढतात. परंतु शरीराच्या काही भागांवरील केस उपटणं हे तुम्हाला महागात पडू शकतं. जाणून घेऊयात ते भाग कोणते आहेत.

1) चामखिळी – अनेकदा चामखिळीवर एक किंवा दोन केस असतात. अशात काहीजण हे केस उपटून किंवा ओढून काढतात. परंतु असं केल्यास तुम्हाला इंफेक्शन होऊ शकतं. यामुळं तीव्र वेदनाही होतात. असे केस काढण्यासाठी तुम्ही ट्रीमर किंवा लेजर हेअर रिडक्शनचाही वापर करू शकतात.

2) स्तनाजवळील केस – स्तनाजवळ काही महिलांना केस असतात. याचं प्रमाण विरळ असतं आणि हे कॉमन आहे. येथील केसही कधीच उपटू नका. यामुळं वेदना आणि इंफेक्शनचा त्रास होईल. 2 मिलीमीटरपेक्षा लहान केस उपटू नका. जर खूपच गरज असेल तुम्ही असे केस ट्रीम करू शकता.

3) आयब्रो – येथील केस उपटल्यानं हेअर फॉल्सिकल्सचा त्रास होऊ शकतो. त्यामुळं अशी चूक कधीही करू नका.

4) इनग्रोव्हन हेअर – व्हॅक्सिंग आणि रेजरचा वापर केल्यान इगग्रोव्हन हेअर वाढतात. त्यामुळं येथील केस उपटल्यास स्कार-डाग आणि इंफेक्शन होऊ शकतं. अशा केसांचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला घेऊ शकता.