सावधान ! फोन आल्यानंतर कुणालाही सांगू नका आईचे नाव, अन्यथा रिकामे होईल बँक खाते

नवी दिल्ली : स्टेट बँकेने आपल्या निर्देशात म्हटले आहे की, चुकूनही कधी फोन करणार्‍या व्यक्तीस आपल्या आईचे नाव तसेच सरनेम शेयर करू नका. स्टेट बँकेने आपल्या डेबिट कार्ड होल्डर्सला असा इशारा दिला आहे. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे आईचे नाव किंवा सरनेम न सांगण्याचा सल्ला देण्यात येत आहेत, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. याचे कारण पासवर्डच्या सुरक्षेशी संबंधीत आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या डेबिट कार्डचा पासवर्ड रिसेट करता त्यावेळी तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. यामध्ये लोक नेहमी आपल्या आईचे नाव किंवा सरनेम देतात. जर तुम्ही असे करत असाल तर फोनवर कुणालाही आईचे नाव किंवा सरनेम सांगू नका.

नाव किंवा सरनेमद्वारे हॅकिंग
फोनवर एखाद्या हॅकर्स किंवा सायबर गुन्हेगाराला आईचे नाव किंवा सरनेम समजले तर तो तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो. यासाठी ही चूक करू नका. खरं तर असा फोन आल्यानंतर चर्चाच करू नका. बँक कधीही ग्राहकाकडून अशाप्रकारची माहिती मागत नाही. यामुळे असा प्रकार घडल्यास बँकेकडे तक्रार करा. माहिती देऊ नका.

पासवर्ड गोपनीय ठेवा
यासाठी हे सुद्धा आवश्यक आहे की, जर तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करत असाल तर आपला यूजर आयडी आणि पासवर्ड गोपनीय ठेवा. तो कुणालाही सांगू नका. कारण यामुळे तुमच्या खात्यातील रक्कमेला धोका निर्माण होऊ शकतो. नेहमी स्ट्राँग पासवर्ड ठेवा. सोपा पासवर्ड ठेवू नका. पासवर्ड सतत बदलत राहा.

ऑनलाइन बँकिंगमध्ये हे लक्षात ठेवा…
* ऑनलाइन बँकिंगमध्ये जी कंपनी किंवा मर्चंटसोबत व्यवहार करत आहात, त्याच्याकडे आपल्या कार्डशी संबंधीत माहिती ठेऊ नका.
* सीव्हीव्ही आणि पिन नंबर कुणालाही सांगू नका.
* डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कुणाला देऊ नका. यूपीआय आणि भीम अ‍ॅपवरून ट्रांजक्शनमध्ये सुद्धा अशीच काळजी घ्या.
* मर्चेंटकडून देण्यात येणारी देय रक्कमेची माहिती तपासल्यानंतर पेमेंट करा.
* यूपीआयद्वारे आधारित अ‍ॅप्स नेहमी अपडेटेड ठेवा. ओळखीच्या व्यक्तीलाच ट्रान्सफर करा.