कोणत्याही जवळच्या व्यक्तीला चुकूनही सांगू नका ‘या’ 4 गोष्टी, नेहमी राहाल सुखी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चाणक्य नीतीमध्ये जीवनमूल्यांबाबत अनेक धोरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. आचार्य चाणक्य एका श्लोकाच्या माध्यमातून त्या चार गोष्टी सांगतात, ज्या व्यक्तीने कुणालाही सांगू नयेत. जाणून घेवूयात या 4 गोष्टी कोणत्या आहेत.

श्लोक
अर्थनाशं मनस्तापं गृहिणीचरितानि च।

नीचवाक्यं चाऽपमानं मतिमान्न प्रकाशयेत॥

1. आचार्य म्हणतात, जर व्यक्तीची आर्थिक स्थिती खराब असेल किंवा व्यापारात नुकसान झाले असेल, किंवा अन्य आर्थिक नुकसान झाले असेल तर ते कुणालाही सांगू नये. व्यक्तीच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती झाल्यास लोक मदत करण्यास घाबरतात. एवढेच नाही, जर लोकांना समजले की व्यक्ती आर्थिकदृष्ट्या संकाटात आहे, तर ते त्या व्यक्तीपासून दूर जातात. या कारणामुळे अशा गोष्टी कुणालाही सांगू नये.

2. यानंतर चाणक्य सांगतात, मनुष्याने आपल्या दु:खाच्या गोष्टी सुद्धा गुप्त ठेवल्या पाहिजेत. लोकांना अशा काही गोष्टी सांगितल्यास लोक थट्टा उडवू शकतात. यामुळे ती व्यक्ती त्रस्त होऊ शकते. यासाठी आपल्या मनातील दु:ख कुणालाही सांगू नका.

3. या श्लोकात चाणक्य स्त्रीच्या चारित्र्याचाही उल्लेख करतात. ते म्हणतात, शहाणा माणूस तोच असतो, जो आपल्या पत्नीच्या वाईट सवयी दुसर्‍या व्यक्तीला सांगत नाही. पती-पत्नीमधील गोष्टी कुणालाही सांगू नयेत. यामुळे पती-पत्नी दोघेही अडचणीत येऊ शकतात.

4. चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीने आपल्या अपमानाचा उल्लेखही कुणासमोर करू नये. जर तुम्हाला एखाद्यावेळी किंवा एखाद्या ठिकाणी अपशब्द ऐकावे लागले असतील तर त्याबाबत कुणालाही सांगू नका. झालेला अपमान कुणालाही सांगितला तर प्रतिष्ठा कमी होते.