लैंगिक संबंधादरम्यान लुब्रिकेंट म्हणून चुकूनही वापरू नका ‘या’ ४ गोष्टी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकदा कपल सेक्सदरम्यान लुब्रिकेंटचा वापर करतात. याबद्दल अनेकांच्या मनात अनेक शंका असतात. लोकांना हे समजायला हवं की, सेक्स नेहमीच स्मूथ असू शकत नाही. त्यामुळे रफ सेक्स करणंही तुमच्या लैंगिक अवयवांसाठी हानिकारक ठरु शकतं. त्यामुळे तुम्ही लुब्रिकेंट वापरू शकता. परंतु जर तुम्ही पुढील काही गोष्टी लुब्रिकेंट म्हणून वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. पुढील गोष्टींचा वापर लुब्रिकेंट म्हणून करू नका.

१) पेट्रोलियम जेली – अनेक कपल सेक्स करताना लुब्रिकेंट म्हणून पेट्रोलियम जेलीचा वापर करतात. परंतु गायनॅकोलॉजिस्टच्या मते याचा वापर करणे टाळायला हवे. यामुळे प्रायव्हेट पार्टला बॅक्टेरियाचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे व्होजायनल इंफेक्शन वाढू शकतं.

२) क्रीम किंवा शुगर सिरप – अनेक कपल फँटसीज पूर्ण करण्यासाठी बेडरुममध्ये एक्साईटमेंटचा माहोल करण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करताना दिसतात. यात विप्ड क्रीम, शुगर सिरप आणि स्वीट सॉसचा समावेश होतो. चुकूनही या गोष्टींचा वापर लुब्रिकेंट म्हणून करू नका. यामुळे इंफेक्शनचा धोका होऊ शकतो.

३) बॉडी लोशन – बॉडी लोशन कितीही चिपचिपीत असलं तरीही याचा वापर लुब्रिकेंट म्हणून चुकूनही करू नका. यात परफ्युम सोबत स्ट्राँग स्मेल असतो जे प्रायव्हेट पार्टमधील स्किनसाठी चांगलं नाही. याशिवाय बॉडी लोशनमधील पैराबीनमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होण्याचाही धोका असतो.

४) ऑलिव्ह ऑईल – एका किचनसाठी ऑलिव्ह ऑईल परफेक्ट आहे. परंतु याला चुकूनही बेडरुममध्ये नेऊ नका. ऑलिव्ह ऑईलमध्ये लुब्रिकेंटचं प्रमाण इतकं असतं की, याच्या वापरामुळे कंडोममधील लॅटेक्स संपून जातं आणि कंडोम काही कामाचं रहात नाही.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like