द्वेष पसरविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर नको : मोदी

वाराणसी : वृत्तसंस्था

द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होऊ नये. एका चांगल्या समाजासाठी हे अत्यंत चुकीचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वाराणसीमधील भाजपा कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
मोदी म्हणाले, प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर विष पेरण्यासाठी तसेच द्वेष पसरवण्यासाठी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मात्र सोशल मीडियाचा वापर आजूबाजूच्या चांगल्या गोष्टींसाठी नक्कीच करा. अनेकदा लोक सभ्यतेच्या मर्यादा ओलंडतात. काही चुकीचे ऐकतात, पाहतात आणि तेच फॉरवर्ड करतात. समाजासाठी हे किती धोकादायक आहे याचा ते विचारच करत नाहीत. काही लोक समाजाला शोभणार नाहीत अशा शब्दांचा वापर करतात. महिलांबद्दल ते काहीही आक्षेपार्ह लिहितात, असे मोदी म्हणाले.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d478dcad-ac03-11e8-8b25-0b6d8f816dd6′]

हा कोणत्याही राजकीय पक्ष किंवा विचारसरणीचा मुद्दा नाही. हा १२५ कोटी भारतीयांचा प्रश्न असून प्रत्येकाने सोशल मीडियावर आपण द्वेष पसरवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत असे मोदी म्हणाले. देशाबद्दल सकारात्मक बातम्या समोर आल्या पाहिजे. समाजाला एकजूट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आजकाल गल्लीत, दोन कुटुंबांमध्ये झालेले भांडणही बातमी होते अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पुणे : माजी आमदार वसंत थोरात यांचे निधन