भाजपला मतदान करू नका ; कलाकारांनी केले आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संविधान धोक्यात आहे, भाजपला मतदान करू नका, त्यांना सत्तेतून बाहेर हाकला. असे आवाहन करत बॉलीवूडसह भारतीय चित्रपटश्रृष्ठीतील सहाशे कलाकारांनी भाजपविरोधात मोहिम हाती घेतली आहे. यासंबंधीत एक पत्रक या कलाकारांनी जारी केले आहे.

या पत्रावर नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, गिरीश कर्नाडसह सहासे कलाकारांच्या स्वाक्षरी आहे. यामध्ये शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शहा, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे, अुनराग कश्यप, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांचा समावेश आहे. तसेच १२ भाषांमध्ये हे पत्र तयार करण्यात आलं असून आर्टिस्ट यूनायटेड इंडियाच्या संकेतस्थळावर ते अपलोड करण्यात आले आहे. भारतीय संविधान धोक्यात आहे. भाजपला मतदान करू नका, असं या पत्रात म्हटले आहे.

आताची लोकसभा निवडणूक ही देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. आज अशी परिस्थितीत आहे की, गीत, नृत्य, हास्यही धोक्यात आहे. आपलं आगळंवेगळं संविधानही धोक्यात आहे. ज्या ठिकाणी तर्क, चर्चा आणि असहमतींना वाव दिला जातो, अशा संस्था, यंत्रणांचा गळा घोटण्यात आला आहे, असे या पत्रात लिहिल आहे.

तर कोणतीही लोकशाही प्रश्न, चर्चा आणि दक्ष विरोधी पक्षांशिवाय परिपूर्ण होऊच शकत नाही. मात्र सध्याच्या सरकारनं या सर्व गोष्टी पायदळी तुडविल्या आहेत. त्यामुळेच सर्वांनी भाजपला सत्तेतून हाकलण्यासाठी मतदान करायला हवं. कट्टरता, घृणा आणि निष्ठुरतेला सत्तेतून घालवा, संविधान वाचवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.