प्रथमच शिवसेने विरोधात ‘राज’ गर्जना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या सहा सभांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या एकही सभांमध्ये शिवसेनेचे नाव घेतले नव्हते. मात्र मुंबईत झालेल्या सभेत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. भाजप सोबतच शिवसेनेलाही मतदान करू नका. असे राज ठाकरे यांनी म्हंटले.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान काल पूर्ण झाले. आता येत्या २९ एप्रिलला चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील काळाचौकी परिसरातील शहीद भगतसिंग मैदानात सभा झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन माणसं या देशासमोरील सर्वात मोठ संकट आहेत. त्यामुळे या दोन माणसांना निवडणूक देऊ नका, भाजपाला निवडून देऊ नका असे आवाहन राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या सभेत केले आहे. इतकेच नव्हे तर. देशात पुन्हा मोदींची सत्ता येऊ नये यासाठी भाजपाला मतदान करुच नका आणि ज्यामुळे भाजपाला मदत होते त्या भाजपासोबत असलेल्या शिवसेनेलाही मतदान करु नका. कारण त्यांना मत देणे म्हणजे या दोघांना मत देणे आहे. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना मला सांगायचे आहे. ईडी अन् सीबीआयच्या धमक्या आज तुम्ही देत आहात. धाडी घालत आहात. मात्र तुम्हीही उद्या विरोधी पक्षात जाणार आहात. त्यामुळे उद्या जेव्हा तुमच्यावरही धाडी पडतील ना, तेव्हा समजेल की नोटाबंदी हा या देशातील सर्वात मोठा स्कॅम आहे. असेही त्यांनी म्हंटले.