ITR फाइल करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत वाट पाहू नका, अन्यथा भरावा लागेल ‘जास्त’ कर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागाने वैयक्तिक इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी अंतिम तारीख ३१ जुलैने वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे. जर तुम्ही अॅडवान्स टॅक्सच्या श्रेणीतील आयकरदाता असाल तर आयटीआर दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंतची वाट पाहू नका आणि लवकरात लवकर आयटीआर दाखल करा नाहीतर तुम्हाला आयकरावर आधिक कर द्यावा लागेल.

यासाठी द्यावा लागेल जास्त कर –

जर तुम्ही वैयक्तिक आयकरदाता असाल आणि पगाराशिवाय इतर स्त्रोतांच्या आधारे तुम्हाचे उत्पन्न असेल तर तुम्हाला अॅडवान्स टॅक्स जमा करावा लागेल. जर तुम्ही ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण टॅक्स भरु शकले नाहीत तर तुम्हाला दर महा टॅक्सवर १ टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. जर तुम्ही ३१ जुलै पर्यंत टॅक्स भरु शकले नाहीत तर तुम्हाला ऑगस्ट मध्ये १ महिना अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

द्यावे लागेल अतिरिक्त शुल्क –

जर तुम्ही अॅडवान्स टॅक्सच्या श्रेणीत येता आणि ३१ मार्च नंतर तुम्ही १५ हजार रुपयांचे देणेकरी आहेत तर तुम्हाला एप्रिल मध्ये आयटीआर दाखल करताना १ टक्के अतिरिक्त शुल्काच्या रुपात १५० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. अशाच प्रकारे तुम्हाला मे महिन्यात ३०० रुपये, जून महिन्यात ४५० रुपये, जुलै महिन्यात ६०० रुपये आणि ऑगस्टमध्ये ७५० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. अशा अतिरिक्त शुल्कापासून वाचण्यासाठी लवकरात लवकर तुमचा आयकर रिटर्न दाखल करा.

काय आहे अॅडवान्स टॅक्स –

अॅडवान्स टॅक्स इनकम टॅक्सचाच भाग आहे. हा टॅक्स त्याच वर्षी जमा केला जातो. ज्या वर्षी तुमचे उत्पन्न येते. अॅडवान्स टॅक्स फक्त त्यांनाच भरावा लागतो. ज्याचा पगार आणि अन्य स्त्रोतांतून कमाई होत तसेच टीडीएस कापल्यानंतर १० हजारापेक्षा आधिक कराचे देणेकरी बनतात. अॅडवान्स टॅक्स तुमच्या मर्जीने द्यायचा असतो आणि चार वेळा जमा करु शकतात. त्याचा पहिला टप्पा दरवर्षी १५ जून, दुसरा टप्पा १५ सप्टेंबर, तिसरा टप्पा १५ डिसेंबरला आणि शेवटाचा टप्पा १५ मार्चला जमा करायचा असतो.

आरोग्यविषयक वृत्त –