‘कोरोना’चा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेवून योग्य नियोजन करा : विभागीय आयुक्त केंद्रेकर

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन –  दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, येणाºया कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले. विशेष म्हणजे हिंगोली येथील डेडीकेटेड कोवीड रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील सुविधांची पाहणी करत जिल्हा रुग्णालयातील उपचाराकरीता भरती असलेल्या रुग्णांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधुन त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा केंद्रेकर यांनी दिल्या.

सोमवारी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आयुक्त केंद्रेकर आले होते, यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. तसेच विभागप्रमुखांना कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर निर्देश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, यावेळी केंद्रेकर म्हणाले मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी, येणाºया कालावधीत कोरोनाचे संकट वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे रुग्णाची संख्या देखील वाढण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. याकरीता खाटांची संख्या वाढवावी. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांची माहिती तयार करुन तेथील खाटांची उपलब्धतेची माहिती तयार करावी. तसेच पाणी, वीज आणि स्वच्छतागृहाची उपलब्धता आहे, अशा वापरात नसलेल्या इमारतीची पाहणी करुन ठेवावी अशाही सूचना दिल्या.

बोगस बियाणे कंपनीमालकांविरूद्ध थेट गुन्हे दाखल करा…

यावेळी कृषि, रोहयो, पाणी पुरवठा विभागांचा आढावा घेत विभागीय आयुक्त केंद्रेकर म्हणाले ज्या शेतातील बियांणांची उगवण झाली नाही अशा बियांणाचे नमुने घेवून तपासणी करावी. ज्या कंपनीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने उगवण झाली नाही अशा कपंनीच्या मालकावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी रोजगार हमी योजना अंतर्गत जिल्ह्याला मंजूर झालेल्या ६०० विहिरींचा आढावा घेतला. तसेच पर्यावरणांचे संतुलन राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालय, रस्त्यांच्या दूतर्फा, वन विभागाच्या जागेवर आणि माळरानावरील टेकड्यावर वृक्षारोपण करावे असे निर्देश दिले. नागरिकांनी देखील अतिमहित्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. घरी थांबून कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.