महिलांसाठी ‘हे’ आसन विशेष लाभदायक, होतील 4 जबरदस्त फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  योग केल्याने शरीर बाहेरून सुंदर दिसतेच, शिवाय आतूनही निरोगी राहते. यासाठी काही योगासन नियमित केली पाहिजेत. यामुळे जीवन संतुलित राहाते. बटरफ्लाय आसन खुप परिणामकारक आहे. महिलांसाठी हे असान विशेष लाभदायक आहे.

असे करा आसन

* पाय समोरील बाजूस पसरवून बसा.

* पाठीचा कणा ताठ ठेवा.

* गुडघे दुमडा अणि दोन्ही पाय ओटीपोटाकडे आणा.

* दोन्ही हातांनी पाय घट्ट पकडा.

* आधारासाठी हात पायांच्या खाली ठेवू शकता.

* कोपरा गुप्तांगाच्या जेवढा जवळ आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करा.

* दिर्घ, खोल श्वास घ्या, श्वास सोडत गुडघे आणि मांड्यांना जमीनीकडे दाबा.

* फुलपाखराच्या पंखाप्रमाणे दोन्ही पाय वर-खाली हलवण्यास सुरूवात करा.

* हळुहळु वेग वाढवा.

* श्वास घ्या आणि श्वास सोडा.

* सुरुवातीला जेवढ्या वेगाने करता येईल तेवढे करा.

* हळुहळु सराव वाढवा.

बटरफ्लाय आसनाचे फायदे

1 मांड्या आणि गुडघ्यांवर चांगला ताण आल्याने नितंबांमध्ये लवचिकता वाढते.

2 मासिक पाळीत होणारी असुविधा कमी होते

3 मानोपॉजच्या लक्षणात आराम मिळतो.

4 गरोदरपणात नियमित केल्यास प्रसुतीमध्ये सहजता.