खांद्याच्या वेदनांपासून मुक्ती देईल दंडासन, मांसपेशींना मिळेल आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – योग केल्याने शरीर बाहेरून सुंदर दिसतेच, शिवाय आतूनही निरोगी राहते. यासाठी काही योगासन नियमित केली पाहिजेत. यामुळे जीवन संतुलित राहाते. दंडासन एक संस्कृत शब्द आहे. जो दोन शब्दांनी तयार झाला आहे. पहिला दंड आणि दुसरा आसन आहे. दंडासन योग मुद्रेचे एक सोपे आसन आहे. हे आत्म-जागृतीच्या उर्जेसाठी मार्ग बनवते. यासाठी दंडासनाला शक्ती आणि चांगले रूप देण्यासाठी आदर्श मानले जाते.

असे करा दंडासन
* प्रथम योगा मॅट जमीनीवर अंथरून त्यावर बसा.
* दोन्ही पाय शरीरासमोर पुढे पसरवा आणि जवळजवळ ठेवा.
* दोन्ही पायांची बोटे तुमच्याकडे झुकलेली आणि खेचलेली असावीत.
* मांड्या आणि कोपर जमीनीवर दाबा.
* दोन्ही हात सरळ आणि पंजे जमिनीवर ठेवा. दोन्ही हात नितंबाजवळ ठेवा.
* पाठीचा कणा आणि मान सरळ ठेवा.
* छाती वर उचला आणि कॉलरबोन पसरवण्यासाठी खांदे थोडे खेचा.
* समोर पहा आणि श्वास सामान्य ठेवा.
* हे दंडासन 20 सेकंद ते एक मिनिटपर्यंत करत राहा.
* तुम्ही हे आसन आपल्या क्षमतेनुसार करू शकता.

दंडासनचे फायदे
* जखडलेल्या खांद्यांसाठी लाभदायक
* पाठीच्या कण्यात लवचिकता आणि मजबूती वाढवते
* मांसपेशी मजबूत होतात
* सायटिका वेदनांमध्ये लाभदायक
* मेंदू शांत ठेवते