अभिनेत्री ऋचा चड्ढाची थेट HM अमित शहांकडे मागणी, म्हणाली – ‘चीनचं काहीतरी करा’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   देशात कोरोना थैमान घातला आहे. रुग्णांची संख्या 1 लाख 80 हजारांवर पोहोचली आहे. सीमा रेषावरही चीनचं संकट आहे आणि कोरोनादेखील चीनमधूनच आला आहे. असं असताना आता चीनचा बंदोबस्त करण्यासाठी अभिनेत्री ऋचा चड्ढा हिनं थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली आहे. चीनसोबत लडाख सीमेवर तणावाची स्थिती आहे.

ऋचानं चीनचा बंदोबस्त करण्याची मागणी करत ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये ऋचानं भाजपचंच एक ट्विट रिट्विट केलं आहे ज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो आहे आणि त्यात लिहिलं की, “आम्हाला कोणाचं काही घ्यायचं नाहीये. परंतु आमचं कोणी काही घेत असेल तर त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल. हेच ट्विट रिट्वि करत ऋचा म्हणते, “चीनचं काहीतरी करां.”

ऋचाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

ऋचाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती आर्टीकल 375 सिनेमात दिसली होती. याशिवाय तिनं डायरेक्टर अय्यर तिवारी यांचा स्पोर्ट ड्रामा सिनेमा पंगा मध्येही काम केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like