30 एप्रिलपूर्वी पूर्ण करा ‘ही’ 4 महत्त्वाची आर्थिक कामं; होईल बक्कळ फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  2021-22 हे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरु झाले आहे. पण आपण तुमच्याशी संबंधित बँकिंग कामे अद्याप केली नसतील तर आता तुम्हाला एप्रिल महिन्याचे दोन दिवस शिल्लक आहेत. ते करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही चार महत्त्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे.

PPF मध्ये करा गुंतवणूक

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (PPF) गुंतवणूकीचा तुम्ही विचार करत असाल, तर पीपीएफ आपल्याला नक्कीच अधिक चांगला Return देऊ शकेल. तुमचे PPF खातं नसल्यास नवीन पीपीएफ खाते उघडा. यातील गुंतवणुकीवर तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल आणि ते करमुक्त आहे.

15G/15H फॉर्म करा जमा

15 H Form हा ज्येष्ठ नागरिकांना भरावा लागतो. तर ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना 15 G Form फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म भरणे आवश्यक आहे कारण Dividend किंवा कोणतेही Interest मिळाल्यास त्यावर TDS-Tax at Source कापला जाऊ नये यासाठी हे फॉर्म भरणे आवश्यक असते.

आवश्यक असल्यास बदला PF मधील योगदान

एप्रिल 2021 पासून EPF संबंधित नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. 2021 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवरील व्याज Taxable केले आहे. म्हणजेच ईपीएफमध्ये वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करत असाल तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जाणार आहे. त्यामुळे आवश्यक असल्यास PF योगदान बदला.

कर नियोजन सुरु करा…

Tax Planning वेळेत सुरू करणे गरजेचे आहे. त्यासाठी गुंतवणूक केली पाहिजे. वर्षाच्या अखेरीस करण्याची कामे म्हणून याकडे पाहणे योग्य नाही. बहुतांशवेळा Tax वाचवण्यासाठी लोक आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत गुंतवणूक करतात. अशावेळी विचार न करता गुंतवणूक केली जाते. त्यामुळे Tax Planning वेळेत सुरू करावे.