चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

पोलिसनामा ऑनलाईन टीम – वजन वाढणे आज काल प्रत्येकांसाठी एक समस्या बनली आहे. अनियमित झोप, अनियमित जेवण, फास्ट फूड असे अनेक कारणे त्यामागे आहेत. शरीराचा वजन वाढण्यासोबतच चेहऱ्यावरील चरबी ही वाढते. ही समस्या जास्त प्रमाणात महिलांमध्ये पाहायला मिळते . यामुळे त्यांच्या सुंदरतेत कमतरता येतो. जाणून घ्या चेहऱ्यावरील जास्त चरबी कमी करण्याचे काही उपाय.

– चेहऱ्यावरील त्वचा आतून टाईट होण्यासाठी नियमितपणे बदाम खाणेही महत्त्वाचे असते. बदाममध्ये ओमेगा३ फॅट ऍसिड, व्हिटॅमिन इ आणि व्हिटॅमिन बी ६ असल्याने चेहऱ्यावरील त्वचा आतून टाईट करण्यास मदत होते.

– भरपूर प्रमाणात पाणी पिणे. यामुळे डिहायड्रेशन होत नाही आणि भूकही कमी लागते. यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यात मदत होते. यामुळे तुम्ही स्लिम दिसू लागत.

– चेहऱ्यावरील साठलेली त्वचा कमी करण्यासाठी चेहऱ्याच्या वेगवेगळ्या एक्सरसाईज करणे फायद्याचे ठरते. अशा पद्धतीचे एक्सरसाईज केल्याने चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसण्यास मदत होते.

च्यूइंगम चघळल्यानेही चेहऱ्याचा अतिरिक्त चरबी कमी होते. च्यूइंगम चघळल्याने एक प्रकारचा व्यायाम होतो. यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. च्यूइंगम चघळताना मांसपेशी आणि स्किनटोन सुधारतो. यामुळे चेहऱ्याचा आकार आकर्षक बनतो. म्हणून नियमित २० मिनिटे च्यूइंगम चघळणे फायद्याचे असते.

आरोग्यविषयक वृत्त –