वयाच्या 18 व्या वर्षापासून करा ‘हे’ काम, मोदी सरकार ‘या’ स्कीमव्दारे आयुष्यभर देईल 5 हजार रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : जर तुमचे वय 18 वर्षे आहे आणि तुम्ही तुमच्या भविष्यासंबंधी कोणतेही प्लानिंग केले नसेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी असणार आहे. कारण आता आम्ही तुम्हाला अशा सरकारी योजनेची माहिती देणार आहोत, त्याचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. या योजनेंतर्गत तुम्ही फक्त काही अशंदान केले तर तुम्हाला 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला 5 हजार रूपये मिळू शकतात. म्हणजेच तुम्हाला वर्षाला 60 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी मोदी सरकारची अटल पेन्शन योजना अत्यंत लोकप्रिय पेन्शन योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला इन्कमची गॅरंटी मिळणार आहे. या योजनेंतर्गत 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते. त्यासाठी तुम्हाला अकाउंट उघडणे गरजेचे आहे. त्यामध्ये दरमहा, तिमाही आणि सहामाही गुंतवणुकीची सुविधा मिळणार आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अकाउंट उघडत असाल तर तुम्हाला दर महिन्याला 210 रुपये जमा करावे लागणार आहे. या हिशोबाने वर्षभरात 2520 रुपये खात्यात भरावे लागणार आहे. हेच 210 रुपये तुम्हाला 60 वर्षांपर्यंत भरावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये मिळत राहतील. म्हणजेच दरवर्षाला 60 हजार रुपये मिळू शकतील.

योजनेचे इतर लाभ काय?

– अटल पेन्शन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना आहे. या माध्यमातून पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणद्वारा संचालित

– इन्कम टॅक्स सेक्शन 80CCD च्या अंतर्गत टॅक्सवर सूट मिळणार आहे.

– एका सदस्याच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येणार.

– अनेक बँकांमध्ये अकाउंट उघडण्याची सुविधा.

– सुरुवातीच्या 5 वर्षांत सरकारकडून योगदान निधीही दिला जाईल.

– तसेच 60 वर्षांपूर्वी किंवा त्यानंतर त्या सदस्याचे मृत्यू झाला तर या पेन्शची रक्कम त्याच्या पत्नीला मिळत राहील.

– इतकेच नाही तर सदस्य आणि त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला तर सरकार नॉमिनीला पेन्शन देईल.