वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून वृक्षारोपण करा : आमदार अशोक पवार

शिक्रापुर : शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा 30 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे.या वाढदिवसानिमित्ताने आमदार अशोक पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा वाढदिवस साधेपणाने साजरा करायचा आहे,वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारे होल्डिंग,बनर्स किंवा जाहिरातबाजी करू नये. माझ्या वाढदिवसानिमित्ताने आपल्याकडून शुभेच्छा म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावू वृक्षारोपण करावे.आपल्या याच शुभेच्छा वृक्षरुपाने माझ्या पाठीशी राहणार आहेत. आजवर आपण सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात आणि यापुढेही असेच सहकार्य आपल्याकडून सदैव लाभेल याचा मला ठाम विश्वास आहे.या आगळ्यावेगळ्या अहवानाला कार्यकर्ते ,शुभचिंतक कशा प्रकारे पाठिंबा देतात हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.