वर्षभर काय करायचे ते करून घ्या, त्यानंतर चुन चुणके : धनंजय मुंडे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता येऊन चार वर्ष झाले. या सरकारकडून विकासाच्या नावाखाली त्यांनी भ्रष्टाचाराला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या सताधायांनी जे काही करायचे आहे. ते वर्षभर करा त्यानंतर शोले च्या चित्रपटातील डायलॉग नुसार चुन चुणके,तर चुकीला माफी नाही. अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला.

पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हडपसर ग्रामस्थ सत्कार समितीच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, फुले पगडी देऊन विशेष गौरवण्यात आले. त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.

[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’42a7c9a1-a8fb-11e8-86a3-3b3b1ee22ce0′]

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारने महागाई केली असे सांगत जनतेची दिशाभूल करून भाजप सरकार सत्तेवर आले. मात्र त्यांनी 50 रुपये पेट्रोल 80 वर घेऊन गेले आणि 400 चा गॅस 800 वर घेऊन गेले. यातून कोणी महागाई केली. यातून स्पष्ट होत आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत खासदार, आमदार आणि नगरसेवक निवडून आले.मात्र लाट कधी कायम राहिली नाही.हा देशाचा इतिहास असल्याचे सांगत भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की, ज्या नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून भाजपला सत्तेमध्ये बसविले आहे. त्या सत्ताधाऱ्याना पाया खाली घेण्यास ते नागरिक तयार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

ते पुढे म्हणाले की, राज्याचे मंत्री, केंद्रीय मंत्री पुण्याचे आहेत. मात्र पुणे शहराचा विकास कुठ गेला अशा शब्दात मुंडे यांनी गिरीश बापट, दिलीप कांबळे, प्रकाश जावडेकर यांचा खरपूस समाचार देखील घेतला.