Juice Ani Chaha Sobat Aushdhache Nuksan : तुम्ही ज्यूस किंवा चहासोबत औषधं घेत नाही ना? जीवाला निर्माण होईल धोका

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बहुतांश लोक पाण्यासोबत औषध घेतात. परंतु असेही काही लोक आहेत जे चहा किंवा ज्यूससोबत औषध, गोळी घेतात. तुम्ही सुद्धा असे करत असाल तर हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रिसर्चमध्ये हे सुद्धा स्पष्ट झाले आहे की, आंबट फळांसोबत औषध घेणे धोकादायक आहे. चहा किंवा ज्यूससोबत औषध घेतल्याने काय होऊ शकते जाणून घेवूयात…

चहामध्ये टॅनिन असते. जे औषधामध्ये मिसळून केमिकल रिअ‍ॅक्शन करते. यासोबतच चहा आणि कॉफीसोबत औषध घेतल्याने औषधाचा परिणाम सुद्धा कमी होतो. अनेकदा तर औषधाचा कोणताही परिणाम होत नाही.

ज्यूससोबत औषध घेतल्यास रिकव्हरी प्रक्रिया संथगतीने होते. आंबट फळांच्या ज्यूससोबत औषध घेतल्यास रिकव्हरी प्रक्रिया संथ होते. आंबट फळांचा ज्यूस औषधाचा परिणाम कमी करतो. यासोबतच यामुळे अँटीबायोटिक्सचा परिणाम सुद्धा कमी होतो. ज्यूस औषधाचे शोषण करण्याची क्षमता कमी करतो.