तुम्हीही दुचाकीवर मुलांना बसवता? भरावा लागेल दंड ! तपशीलवार जाणून घ्या मोटार वाहन कायदा

पोलिसनामा ऑनलाईन – सध्याच्या काळात सर्वकाही ऑनलाईन होत आहे. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसही अभिमानाने ऑनलाईन चलन कापत आहेत. आजच्या काळात हे आवश्यक नाही की जेव्हा रस्त्यावर पोलीस तुम्हाला थांबवतील तेव्हाच तुमचे चलन कापले जाईल, परंतू आता वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर कॅमेरे लावले आहेत. अशा परिस्थितीत आपण कोणतेही नियम मोडल्यास चलन थेट आपल्या घरत पोहोचेल.

तिसऱ्या सवारीत चार वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मुलांची गणना केली जाईल
जर तुम्हीही तुमच्या मुलांना दुचाकीवर बसवत असाल तर तुम्हाला हा नियम माहिती असणे आवश्यक आहे. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांची गणना तिसऱ्या सवारीत केली जाईल. जर दोन लोक दुचाकीवरून जात असाल आणि आपल्यासोबत मुलं असेल आणि ते चार वर्षांपेक्षा जास्त वयाचे असेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. खरं तर नवीन मोटार वाहन कायद्यांतर्गत, चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांची गणना तिसऱ्या सवारीत केली जाईल आणि जर एखादी व्यक्ती त्यांच्यासह सहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलास घेऊन जात असेल तर मुलाने हेल्मेट घालणे आवश्यक आहे. असे न केल्यास सेक्शन १९४A अंतर्गत १००० रुपये दंड द्यावा लागेल.

जर तुम्ही कधीही दुचाकी अथवा स्कुटीवरून बाहेर जात असाल आणि तुमच्यासोबत चार वर्षांपेक्षा मोठे मुलं असेल तर तुम्ही मुलास घेऊन जाऊ नका. अन्यथा आपले चलन कापले जाऊ शकते. यातही तुम्हाला १००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

१६ ते १८ वयोगटातील मुले दुचाकी चालवू शकतात
देशात दोन पातळ्यांवर दुचाकी परवाना दिला जातो. यामध्ये पहिला स्तर १० ते १८ वर्ष वयोगटातील आणि दुसरा स्तर १८ वर्षांवरील लोकांसाठी आहे. या कारणास्तव, १६ ते १८ वयोगटातील मुलेही दुचाकी चालवू शकतात. तथापि, त्यांना केवळ गियरशिवाय दुचाकी चालविण्याची परवानगी आहे आणि यातही जास्तीत जास्त ५० सीसीचे वाहन असण्याची अट आहे. तर द्वितीय स्तराचा परवाना १८ वर्षांवरील लोकांसाठी देण्यात येतो. त्यात कोणतीही अट नाही.

हॉर्न वाजविल्यावर दंड लागू शकतो
बऱ्याचवेळा वाहन रस्त्यावर थांविल्यावर आपण मोबाईलवर बोलू लागतो. परंतू आता तुम्ही सायलेंट झोनमध्ये आहात का? हे पहावे लागेल. कारण सायलेंट झोनमध्ये कार थांबवून मोबाईलवर बोलल्यास तुम्हाला एक हजार रुपये दंड होऊ शकतो. त्याचबरोबर सायलेंट झोनमध्ये हॉर्न वाजविण्याकरिता १००० रुपयांची पावती लागू शकते.

नवीन नियमांतर्गत दंड
देशात वाढते रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने New Traffic Rules २०२० लागू केले आहेत. जर तुम्ही आता वाहतुकीचे कोणतेही नियम मोडले तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

लाल लाईट तोडल्यास – ५०० रुपये दंड
लायसेंन्सशिवाय गाडी चालविल्यास – ५००० रुपये दंड
ओव्हर स्पिडिंग – १००० रुपये दंड
रस्त्यावर स्टंटबाजी करणे – ५००० रुपये दंड
रेसिंग करणे – ५००० रुपये दंड
हेल्मेट न घातल्यास – १००० रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द
इन्शोरंन्सशिवाय गाडी चालवणे – २००० रुपये दंड