तुम्ही तुमच्या स्वाक्षरीमध्ये रेष / लाइन काढतात का ? जाणून घ्या त्याचा अर्थ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : (डॉ. नवनीत मानधनी) – आपल्यापैकी बरेच जण कोणत्याही भाषेत सही केल्यानंतर सहीच्या खाली लाइन, सहीच्या वरती लाइन, सहीच्या मध्ये लाइन, सहीच्या नंतर लाइन, काही जणांच्या लाइन वरती असतात, तर काही जणांच्या लाइन खालती असतात, काही जणांच्या लाइन सहीच्या मध्येपण असतात, काही जणांच्या सहीच्या खाली दोन-तीन लाइन्स असतात, काही जणांच्या सहीच्या खालती नागमोडी लाइन्स असतात…

आता जाणून घेऊया त्यात दडलेला अर्थ…

जी व्यक्ती आपल्या सहीच्या खाली सरळ (staright) लाइन काढतात ती लोक खूप शिस्तबद्ध असतात, ती लोक खूप वेळ पाळतात आणि इतारांकडून ही वेळेवर काम करण्याची अपेक्षा करतात. काही लोक ती सही खालची लाइन खूप जास्तच सरळ काढतात म्हणजे अतिशयोक्ती (exgratetion), ती व्यक्ती फक्त दाखवतात की ते शिस्तबद्ध आहेत पण ती नसतात आणि इतारांकडून अपेक्षा करतात की ती लोक वेळेवर काम केली पाहिजेत पण स्वतः शिस्तबद्ध नसतात.

* काही लोक ती सहीच्या खालची लाइन दोन वेळा काढतात ह्या लोकांची तर गमंतच वेगळी आहे…ही लोक कमी विश्वासी (underconfident) असतात. म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स नसतो आणि आपल्याला ऐकून मजा येईल अशा लोकांसोबत तुम्ही प्रवासाला जा ,ती लोक दोन दोनदा विचारतात ही गाडी इथेच जाणार का ? तिकीट दोन दोनदा तपासतात आहे की नाही ते, घरचे कुलूप जर लावले असेल तर परत जाऊन चेक करतात लावलेलं आहे की नाही, ही लोक विमानात जरी बसली विमान आता उडणार तरी परत चेक करतात हे तेच विमान आहे का, असे लोक कमी विश्वासू असतात ,सहीच्या खाली दोन लाइन असणं चुकीचं आहे.

* काही लोकांच्या सहीच्या खालची लाइन सरळ जाते पण ती रिव्हर्स येते म्हणजेच उलट जाताना दिसते (last minute plan changer) अचानक निर्णय बदलतात (U- Turn) घेतात ,असे लोक जर तुमच्या व्यापारात (Business) असतील तर अशा व्यक्तीच्या निर्णयावर कधीच अवलंबून राहू नका ही लोक शेवटी निर्णय बदलतील.

* त्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे एखाद्याची सही करून जर तीन-चार लाइन करत असतील किंवा खाली नागमोडी लाइन (Waves) काढलेली असतील तर ह्या लोकांचे निर्णय चुकतात आणि आर्थिक नुकसान फार होतात. आयुष्यात सतत आजारीपण येते.

* सही करून जर त्या सहीला मधातूनच खोडलेलं असेल ती लोक स्वतः वर नाराज असतात. अशा लोकांचे पण आर्थिक नुकसान पण खूप होते.

* काही लोक इंग्रजी मध्ये सही करतात आणि वरती लाइन काढतात अशी लोक निर्णय घेताना इतरांवर खूप अवलंबून असतात. ह्यांना कोणी ना कोणी मदत करायला लागतो. त्यांना स्वतःवर कमी विश्वास असतो.

अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच कळलं असेल की एक रेष (line) जी तुम्ही सहीत समाविष्ट करतात तिचे महत्त्व किती जास्त आहे.

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (8605112233)